इटलीत जाऊन लग्न करणारे विराट-अनुष्का देशद्रोही : भाजप आमदार

मध्य प्रदेशातील भाजप आमदाराचं विराट-अनुष्काच्या लग्नावर अजब वक्तव्य समोर आलं आहे.

इटलीत जाऊन लग्न करणारे विराट-अनुष्का देशद्रोही : भाजप आमदार

भोपाळ : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाची जोरदार चर्चा झाली. इटलीत खाजगी स्वरुपात झालेल्या या विवाह सोहळ्यानंतर त्यांना बॉलिवूडसह क्रिकेट जगतातील दिग्गजांनी शुभेच्छा दिल्या. आता मध्य प्रदेशातील भाजप आमदाराचं अजब वक्तव्य समोर आलं आहे.

मध्य प्रदेशातील गुणा येथील आमदार पन्नालाल शाक्य शाळेतील विद्यार्थ्यांना देशाशी एकनिष्ठ राहण्यावर व्याख्यान देत होते. त्यावेळी त्यांच्या निशाण्यावर विराट कोहली आला. परदेशात जाऊन लग्न केल्यामुळे त्यांनी कोहलीवर तोंडसुख घेतलं.

''देशासाठी खेळणाऱ्या विराट कोहलीने परदेशात जाऊन अनुष्का शर्मासोबत लग्न केलं. याला देशभक्ती नाही म्हणत. देशातला पैसा परदेशात खर्च करणं चुकीचं आहे. तुम्ही देशासाठी खेळता, पैसा कमावता आणि लग्न परदेशात जाऊन करता. याला देशभक्ती नाही, देशद्रोह म्हणातात'', असं पन्नालाल शाक्य म्हणाले.

पन्नालाल शाक्य यांनी विराट आणि अनुष्काला पैशाचा सदुपयोग करण्याबाबत सल्लाही दिला. ''विराट आणि अनुष्काने लग्नासाठी जेवढा पैसा खर्च केला, त्यात किती गरीबांना रस्ता आणि वीज मिळाली असती. दोघांनीही लाखो चाहत्यांचा अपमान केला आहे'', असं ते म्हणाले.

संबंधित बातम्या :

'विरानुष्का'ला इटलीचं रिसॉर्ट 'या' सेलिब्रेटी कपलने सुचवलं


विराट-अनुष्काच्या लग्न आणि हळदीचा व्हिडिओ


दिल्लीत 21, तर मुंबईत 26 तारखेला 'विरानुष्का'च्या लग्नाचं रिसेप्शन


विराट-अनुष्काच्या लग्नाचा पहिला फोटो!

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: virat anushka who married in Italy are Traitors statement of BJP MLA
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV