विराटचं आणखी एक द्विशतक, सर्वाधिक द्विशतक ठोकणारा एकमेव कर्णधार

त्याने ब्रायन लाराचा पाच द्विशतकांचा विक्रम मोडीत काढला.

विराटचं आणखी एक द्विशतक, सर्वाधिक द्विशतक ठोकणारा एकमेव कर्णधार

नवी दिल्ली : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने दिल्लीत सुरू असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत पुन्हा एकदा शानदार द्विशतक झळकावलं. या मालिकेतलं विराटचं हे सलग दुसरं, यंदाच्या वर्षातलं तिसरं तर कसोटी कारकीर्दीतलं एकूण सहावं द्विशतक ठरलं.

सर्वाधिक द्विशतक झळकावणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत विराट आता सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवागसोबत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचबरोबर कर्णधार या नात्याने सर्वाधिक द्विशतक ठोकणारा विराट जगातला पहिला फलंदाज ठरला. त्याने ब्रायन लाराचा पाच द्विशतकांचा विक्रम मोडीत काढला.

कर्णधार म्हणून ब्रायन लाराच्या नावावर 5, ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार सर डॉन ब्रॅडमन 4, ग्रॅमी स्मीथ 4 आणि मायकल क्लार्कच्या नावावर 4 द्विशतक आहेत.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: virat become first captain to hit most test
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV