द. आफ्रिकेकडून भारतीय गोलंदाजांची धुलाई, विराट म्हणतो...

हा दिवस भारतीय गोलंदाजांचा नव्हता, असंही त्याने सामन्यानंतर बोलताना सांगितलं.

द. आफ्रिकेकडून भारतीय गोलंदाजांची धुलाई, विराट म्हणतो...

सेन्चुरियन : दक्षिण आफ्रिकेने सेन्चुरियनच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा 6 विकेट्सने धुव्वा उडवला. दक्षिण आफ्रिकेने हा सामना जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.

दक्षिण आफ्रिकेचं चांगलं प्रदर्शन हे भारताच्या पराभवाचं कारण होतं, असं कर्णधार विराट कोहली म्हणाला. हा दिवस भारतीय गोलंदाजांचा नव्हता, असंही त्याने सामन्यानंतर बोलताना सांगितलं.

भारताचा फिरकीपटू यजुवेंद्र चहल कालच्या सामन्यातला सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने चार षटकांमध्ये एकही विकेट न घेता 64 धावा दिल्या. जयदेव उनाडकट 2 आणि शार्दूल ठाकूर, हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी एका फलंदाजाला माघारी धाडलं.

हा सामना गोलंदाजांसाठी अवघड होता. सुरुवातीच्या विकेट लवकर गमावल्यानंतर आम्हाला 175 च्या आसपास धावा करण्याची अपेक्षा होती. मनीष पांडे आणि सुरेश रैना यांच्या खेळीने अपेक्षा वाढल्या. त्यानतंर महेंद्रसिंह धोनीने शानदार खेळी करत मोठी मजल मारुन दिली, असंही विराट म्हणाला.

भारताच्या गोलंदाजीवेळी 12 व्या षटकानंतर सुरु झालेल्या पावसाने अडचणी आणखी वाढवल्या, त्यानेच मोठं नुकसान झालं, असं विराटने सांगितलं.

दरम्यान, विराटने दक्षिण आफ्रिकेला या विजयाचं पूर्ण क्रेडिट दिलं. दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी जो खेळ केला तो पाहता तेच विजयाचे प्रबळ दावेदार होते. फलंदाजांनी चांगली कामगिरी केली, असं म्हणत विराटने प्रतिस्पर्धी संघाचंही कौतुक केलं.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: virat kohli after defeat against second t20 agai
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV