विराट-अनुष्काच्या ग्रॅण्ड रिसेप्शनचा खास व्हिडीओ

विराट आणि अनुष्काच्या या रिसेप्शनचा एक व्हीडिओही आता समोर आला आहे. ज्यामध्ये हॉटेलमध्ये जाण्यापूर्वी 'विरानुष्का'नं मीडियाच्या कॅमेऱ्यांना खास पोझ दिली.

विराट-अनुष्काच्या ग्रॅण्ड रिसेप्शनचा खास व्हिडीओ

मुंबई : दिल्लीनंतर मुंबईतील सेंट रेजिस या पंचतारांकित हॉटेलमध्ये विराट आणि अनुष्कानं आपल्या खास पाहुण्यांसाठी रिसेप्शन आयोजित केलं होतं. या रिसेप्शनला क्रिकेटपासून बॉलिवूडमधील अनेक बड्या-बड्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

टीम इंडियाचा कर्णधार आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाची यंदा बरीच चर्चा होती. याच लग्नाचं आज दुसरं रिसेप्शन मुंबईत पार पडलं. यावेळी विराट आणि अनुष्कानं खास पेहराव केला होता.

यावेळी विराटनं जोधपुरी स्टाईलचा व्हेल्वेट सूट, तर अनुष्कानं सोनेरी वेलबुट्टीचा डिझायनर लेहंगा परिधान केला आहे. पंजाबी संस्कृतीनुसार परिधान केलेला लाल चूडाही अनुष्काच्या हातात उठून दिसत होता.

दरम्यान, विराट आणि अनुष्काच्या या रिसेप्शनचा एक व्हीडिओही आता समोर आला आहे. ज्यामध्ये हॉटेलमध्ये जाण्यापूर्वी 'विरानुष्का'नं मीडियाच्या कॅमेऱ्यांना खास पोझ दिली.

VIDEO :Arrival at Reception! 😍❤️


A post shared by Virat Kohli (@viratkohli.club) on
क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Virat kohli anushka sharma reception video latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV