मित्राच्या लग्नात विराटचे 'कजरा रे'वर ठुमके, व्हिडीओ व्हायरल

विराटने त्याचा मित्र गगन आणि मलिकाच्या लग्नाला उपस्थिती लावली होती. या लग्नाच्या पार्टीत अनुष्कालाही आमंत्रण होतं.

मित्राच्या लग्नात विराटचे 'कजरा रे'वर ठुमके, व्हिडीओ व्हायरल

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या सुट्टीवर आहे. या सुट्टीत विराट एकदम मस्तीच्या मूडमध्ये आहे. नुकतंच एका मित्राच्या लग्नात विराट कोहली ऐश्वर्या रायच्या 'कजरा रे' गाण्यावर थिरकला.

सोशल मीडियावर विराटचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. 'बंटी और बबली' सिनेमातील ऐश्वर्याच्या 'कजरा रे' गाण्यावर विराट डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ विराटच्या मित्राच्या लग्नातील आहे. विरुष्काच्या फॅन पेजवर शेअर केलेल्या ह्या व्हिडीओमध्ये अनुष्काची आईदेखील दिसत आहे.
विराटने त्याचा मित्र गगन आणि मलिकाच्या लग्नाला उपस्थिती लावली होती. या लग्नाच्या पार्टीत अनुष्कालाही आमंत्रण होतं. पण काही कारणाने ती हजर राहू शकली नाही.

हा व्हिडीओ भारतीय टीम श्रीलंकेला रवाना होण्याच्या आधीचा आहे, कारण यात विराट कोहलीसोबत क्रिकेटर शिखर धवनी डान्स करताना दिसत आहे. शिखर धवन सध्या तिरंगी मालिकेसाठी लंकेत गेलेल्या भारतीय संघाचा सदस्य आहे.


क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Virat Kohli dances to ‘Kajra Re’ at friend’s wedding, video goes viral
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV