कोहलीचा दिलदारपणा, स्वत:चा अवॉर्ड चाहत्याला दिला!

कोहलीचा दिलदारपणा, स्वत:चा अवॉर्ड चाहत्याला दिला!

मुंबई : आयपीएल 2017 च्या अखेरचा साखळी सामना रॉयल चॅलेन्जर्स बंगलोर आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात बंगळुरुच्या संघाने विजय मिळवला. शानदार अर्धशतक ठोकणारा बंगळुरुचा कर्णधार विराट कोहलीला 'स्टायलिश प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्कार मिळाला. पण कोहलीने दिलदारपणा दाखवत त्याचा हा पुरस्कार एका फॅनला दिला.

पुरस्कार सोहळा संपल्यानंतर विराट कोहली धावत प्रेक्षकांच्या इथे पोहोचला आणि ट्रॉफी फॅनला दिली. एका ट्विपलने या प्रसंगाचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला.

दरम्यान, आयपीएलमधील रॉयल चॅलेन्जर्स बंगलोरचं आव्हान यापूर्वीत संपुष्टात आलं आहे.

दुसरीकडे, आयपीएलच्या दहाव्या मोसमातला प्ले ऑफचा पहिला सामना आज रात्री आठ वाजता मुंबई वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. क्वालिफायर वनच्या या सामन्यात मुंबई इंडियन्सचा मुकाबला पुणे सुपरजायंटशी होत आहे. हा सामना जिंकणाऱ्या संघाला थेट आयपीएलच्या फायनलचं तिकीट मिळेल.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV