विराटची रँकिंगमध्येही झेप, दुसऱ्या स्थानी विराजमान!

विराटनं श्रीलंकेविरुद्धच्या दिल्ली कसोटीत 243 आणि 50 धावांची खेळी उभारली.

विराटची रँकिंगमध्येही झेप, दुसऱ्या स्थानी विराजमान!

मुंबई: टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं आयसीसीच्या कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत पाचव्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.

विराटनं श्रीलंकेविरुद्धच्या दिल्ली कसोटीत 243 आणि 50 धावांची खेळी उभारली. तीन कसोटी सामन्यांच्या या मालिकेत त्यानं लागोपाठ दोन द्विशतकं ठोकली आणि 610 धावांचा रतीब घातला.

भारतीय कर्णधाराला याच कामगिरीनं आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत दुसरं स्थान मिळवून दिलं.

वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांमधल्या फलंदाजांच्या क्रमवारीत विराट कोहली अव्वल स्थानावर आहे. आजवरच्या इतिहासात रिकी पॉन्टिंगनं एकाच वेळी तीन फॉरमॅट्सच्या क्रमवारीत अव्वल स्थान मिळवलं होतं. त्याच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा आता विराटचा प्रयत्न राहिल.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ 938 गुणांसह कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर विराट कोहली 893, इंग्लंडचा ज्यो रुट 879, भारताचा चेतेश्वर पुजारा 873 आणि न्यूझीलंडचा केन विल्यमसन 865 यांचा नंबर लागतो.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Virat Kohli has moved up three places to second spot in the ICC rankings for Test batsmen
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV