विराटचा बुलेट थ्रो, धोनीही पाहत राहिला

विराटने फलंदाजीसोबतच क्षेत्ररक्षणातही चोख कामगिरी बजावली. विराटने 19 व्या षटकात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाला अशा पद्धतीने बाद केलं, ज्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

विराटचा बुलेट थ्रो, धोनीही पाहत राहिला

रांची : विराट कोहलीच्या टीम इंडियाने रांचीच्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा नऊ विकेट्सनी धुव्वा उडवून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला स्वस्तात रोखून निम्मी कामगिरी फत्ते केली होती. पण त्यानंतर आलेल्या पावसाने भारतासमोरचं आव्हान कठीण केलं.

डकवर्थ लुईस नियमानुसार भारतासमोर सहा षटकांत विजयासाठी 48 धावांचं आव्हान होतं. भारताने 5.3 षटकांमध्येच एका विकेटच्या मोबदल्यात या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला. सलामीवीर रोहित शर्मा 11 धावांवर बाद झाला.

या सामन्यात विराट कोहलीने नाबाद 22, तर शिखर धवनने नाबाद 15 धावांची खेळी केली. विराटने फलंदाजीसोबतच क्षेत्ररक्षणातही चोख कामगिरी बजावली. विराटने 19 व्या षटकात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाला अशा पद्धतीने बाद केलं, ज्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे.

भुवनेश्वर गोलंदाजी करत असताना डॅन क्रिश्चनने मारलेला चेंडू विराटने अडवला. फलंदाज धाव घेणार इतक्यातच विराटने तो चेंडून सीमारेषेवरुन थेट स्टम्पच्या दिशेने फेकला. विराटने फेकलेला हा चेंडू थेट स्टम्पवर जाऊन आदळला आणि ऑस्ट्रेलियाला आणखी एक धक्का दिला. स्टम्पजवळ उभा असलेला विकेटकीपर धोनीही यावेळी पाहत राहिला.

पाहा व्हिडिओ :

https://twitter.com/SBakshi13/status/916703824173076482

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV