VIDEO : धोनीची मुलगी झिवासोबत विराटचे बोबडे बोल

गार्डनमध्ये झिवाशी खेळताना विराटने मांजरीचा आवाज काढून दाखवला. त्यानंतर दोघांमधल्या गप्पा 30 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतात.

VIDEO : धोनीची मुलगी झिवासोबत विराटचे बोबडे बोल

मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला लहान मुलांचा किती लळा आहे, हे अनेकदा त्याच्या ट्वीट्समधून पाहायला मिळतं. धोनीची मुलगी झिवावर तर विराटचा विशेष जीव आहे. झिवासोबत खेळतानाचा एक व्हिडिओ नुकताच विराटने शेअर केला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पहिला टी20 सामना जिंकल्यानंतर कोहलीने रांचीमध्ये महेंद्रसिंग धोनीच्या घरी भेट दिली. गार्डनमध्ये झिवाशी खेळताना विराटने मांजरीचा आवाज काढून दाखवला. त्यानंतर दोघांमधल्या गप्पा 30 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतात.

'झिवाला पुन्हा भेटलो. निरागसता तुमच्या भवताली असणं, याहून दुसरं भाग्य ते काय!' असं लिहित विराटने दोघांचा व्हिडिओ शेअर केला आहे.

https://twitter.com/imVkohli/status/916986888648560641
यापूर्वीही विराटने शमीच्या मुलीसोबत डान्स करतानाचा व्हिडिओ पोस्ट केला होता. तर झिवासोबतचे अनेक क्यूट फोटोज त्याने शेअर केले आहेत.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV