फिटनेस किंग विराट कोहलीचा 'डाएट चार्ट'

विराट आपल्या फिटनेससाठी जिम आणि सरावासोबत डाएटही तितक्याचा काटेकोरपणे पाळतो.

फिटनेस किंग विराट कोहलीचा 'डाएट चार्ट'

केपटाऊन : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने केवळ आपल्या फिटनेसच्या जोरावर संपूर्ण क्रिकेटविश्वात एक नवी उंची गाठली आहे. त्याची कामगिरी दिवसेंदिवस उंचावत चालली आहे. आपल्या वाढत्या वयाबरोबर विराट जास्तीत जास्त फीट होत असून एक उत्कृष्ट अॅथलीट म्हणून समोर येत आहे.

आपल्या शानदार कामगिरीचं श्रेय विराट मेहनत आणि फिटनेसला देतो. मैदानावर चपळ राहण्यासाठी फिटनेसही तितकाच महत्त्वाचा आहे. म्हणून विराट फिटनेसबाबत नेहमीच जागरुक असतो.

नुकतंच विराट म्हणाला होता की, 'मी यंदा 30 वर्षाचा होईन. त्यामुळे मला असं वाटतं की, वाढत्या वयासोबतच माझा फिटनेसही चांगला राहायला हवा. जेणेकरुन मी वयाच्या 34-35 व्या वर्षीही असाच खेळत राहू शकतो. यासाठीच मी प्रचंड सराव करतो.'

'जेवढा जास्त सराव करता येईल तेवढा करण्याच मी प्रयत्न करतो. जे मला सामन्याच्या वेळी उपयोगी पडतं.' असंही विराट यावेळी म्हणाला.

विराटने क्रिकेटच्या मैदानात फिटनेससाठी एक बेंचमार्क सेट केला आहे. त्यामुळे संघात येणाऱ्या नव्या खेळाडूंसाठी तो एक आदर्श ठरतो आहे.

विराट आपल्या फिटनेससाठी जिम आणि सरावासोबत डाएटही तितक्याचा काटेकोरपणे पाळतो. पाहा विराटचा डाएट चार्ट :

ब्रेकफास्ट :

4 अंड्याचं ऑमलेट यामध्ये तीन व्हाईट एगचा समावेश, पालक, काळी मिरी आणि चीज, ग्रील्ड मच्छी,

तर फळांमध्ये पपई, ड्रॅगन फ्रूट आणि कलिंगडचा समावेश

याशिवाय विराट नट बटर आणि ग्लुटन फ्री ब्रेडही खातो.

तसंच दिवसभरात 3 ते 4 लेमन ग्रीन टी घेतो.

लंच :

ब्रेकफास्टनंतर दुपारच्या जेवणात विराट रोस्टेड चिकन, उकडलेले बटाटे, उकडलेल्या हिरव्या भाज्या आणि पालक घेतो. तसंच जेवणात मटणाचाही समावेश असतो.

डिनर :

विराट कोहली डिनरमध्ये फारच कमी पदार्थ घेतो. यावेळी तो फक्त उकडलेलं किवां भाजलेलं 'सी फूड'ला पसंती देतो.

विराटला बटर चिकन प्रचंड आवडतं पण फिटनेससाठी त्याने गेल्या बऱ्याच दिवसात आपला आवडता पदार्थ खाल्लेला नाही.

विराट जेव्हा दौऱ्यावर असतो त्यावेळी तो जिममध्ये 90 मिनिटं व्यायाम करतो. पण जेव्हा तो दौऱ्यावर नसतो त्यावेळी तो दिवसभरातील चार तासाहून अधिक वेळ जिममध्ये घालवतो.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Virat says it’s all about fitness and Diet latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV