विजेंदरच्या विजयावर सेहवागचं मजेशीर ट्वीट

भारताचा व्यावसायिक बॉक्सर विजेंदरसिंग चीनचा नंबर वन बॉक्सर झुल्पिकार मायमायतियाली धूळ चारत सलग नववा बॉक्सिंग व्यावसायिक सामना जिंकला.

By: | Last Updated: > Saturday, 5 August 2017 11:39 PM
virenda sehwag tweet on vijender singh victory latest updates

मुंबई : भारताचा व्यावसायिक बॉक्सर विजेंदरसिंग चीनचा नंबर वन बॉक्सर झुल्पिकार मायमायतियाली धूळ चारत सलग नववा बॉक्सिंग व्यावसायिक सामना जिंकला. या लढतीच्या निमित्ताने मुंबईच्या क्रीडा रसिकांना शनिवारी व्यावसायिक बॉक्सिंगच्या रिंगमध्ये भारत विरुद्ध चीन असा मुकाबला पाहायला मिळाला.

विजेंदर सिंहच्या या विजयानंतर टीम इंडियाचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने त्याच्या नेहमीच्या शैलीत खास ट्वीट केलं आहे. सामना पाहताना हक्का नुडल्सचा आनंद घेतला आणि तू चायनिज हक्का बक्का बनवलास, अभिनंदन, असं ट्वीट सेहवागने केलं.

मुंबईच्या एनएससीआयमध्ये हा सामना खेळविण्यात आला होता. ही लढत व्यावसायिक बॉक्सिंगमधल्या दोन प्रतिष्ठेच्या किताबांसाठी खेळवण्यात आली होती. बॅटलग्राऊंड एशिया असं शीर्षक या लढतीला देण्यात आलं होतं. या लढतीचा विजेता बॉक्सर विजेंदरनं आशिया पॅसिफिक सुपर मिडलवेट चॅम्पियन आणि ओरिएन्टल सुपर मिडलवेट चॅम्पियन हे दोन्ही किताब पटाकवले आहेत.

विजेंदरसिंगची व्यावसायिक बॉक्सिंगमधली ही नववी लढत होती त्यानं याआधीच्या आठही लढती जिंकल्या होत्या. चीनच्या झुल्पिकारनं आजवरच्या नऊपैकी सहा लढतींमध्ये नॉकआऊट विजय साजरा केला होता.

Sports News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:virenda sehwag tweet on vijender singh victory latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

पुजारा, हरमनप्रीतला अर्जुन पुरस्कार, राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा
पुजारा, हरमनप्रीतला अर्जुन पुरस्कार, राष्ट्रीय क्रीडा...

नवी दिल्ली : टीम इंडियाचा क्रिकेटर चेतेश्वर पुजारा आणि महिला

नायकेच्या किटचा दर्जा खराब, खेळाडूंची बीसीसीआयकडे तक्रार
नायकेच्या किटचा दर्जा खराब, खेळाडूंची बीसीसीआयकडे तक्रार

नवी दिल्ली : टीम इंडियाची ऑफिशिअल किट स्पॉन्सर कंपनी नायकेवर खेळाडू

संघात लवकरच मोठे बदल पाहायला मिळतील : कोहली
संघात लवकरच मोठे बदल पाहायला मिळतील : कोहली

दम्बुला :  टीम इंडियानं 9 गडी राखून श्रीलंकेविरुद्धचा पहिलाच वनडे

सतत पराभव, संतप्त श्रीलंकन प्रेक्षकांनी खेळाडूंची बस अडवली!
सतत पराभव, संतप्त श्रीलंकन प्रेक्षकांनी खेळाडूंची बस अडवली!

दम्बुला : कसोटीनंतर पहिल्या वन डेतही मिळालेल्या पराभवानंतर

क्रीजमध्ये पोहोचूनही रोहित शर्मा बाद का झाला?
क्रीजमध्ये पोहोचूनही रोहित शर्मा बाद का झाला?

दम्बुला : श्रीलंकेला कसोटी मालिकेत 3-0 ने धूळ चारल्यानंतर भारताने वन

श्रीलंकेचा धुव्वा, टीम इंडियाचा दणदणीत विजय
श्रीलंकेचा धुव्वा, टीम इंडियाचा दणदणीत विजय

दम्बुला : विराट कोहलीच्या टीम इंडियानं दम्बुलाच्या पहिल्या वन डेत

श्रीलंकेला वन डेतही धूळ चारण्यासाठी विराट ब्रिगेड सज्ज!
श्रीलंकेला वन डेतही धूळ चारण्यासाठी विराट ब्रिगेड सज्ज!

मुंबई : भारत आणि श्रीलंका संघांमधल्या पाच वन डे सामन्यांच्या

माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे कठोर नव्हते : साहा
माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे कठोर नव्हते : साहा

कोलकाता : टीम इंडियाच्या बहुतेक शिलेदारांना माजी प्रशिक्षक अनिल

भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाचा वनडे-टी20 संघ जाहीर
भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाचा वनडे-टी20 संघ जाहीर

मेलबर्न : श्रीलंकेत दमदार कामगिरी करणाऱ्या टीम इंडियासाठी पुढची

अंडर-19 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर
अंडर-19 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर

मुंबई : अंडर-19 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचं वेळापत्रक आज (गुरुवार)