...अगली सिलाई त्रिवेंद्रम में, टेलरकडून सेहवागची फिरकी

सेहवाने पूर्वी रॉस टेलरचा दर्जी अर्थात टेलर असा उल्लेख केला होता. त्याला टेलरने तेव्हाही उत्तर दिलं होतं.

...अगली सिलाई त्रिवेंद्रम में, टेलरकडून सेहवागची फिरकी

मुंबई: ट्विटरवरुन अनेकांची फिरकी घेणाऱ्या वीरेंद्र सेहवागला त्याच्याच तोडीचं, त्याच्याच भाषेत उत्तर देणारा पठ्ठ्या सापडला आहे. हा पठ्ठ्या आहे न्यूझीलंडचा धडाकेबाज फलंदाज रॉस टेलर.

सेहवाने पूर्वी रॉस टेलरचा दर्जी अर्थात टेलर असा उल्लेख केला होता. त्याला टेलरने तेव्हाही उत्तर दिलं होतं. आता राजकोटमधील दुसऱ्या टी ट्वेण्टी सामन्यानंतरही टेलरने तोच धागा पकडत, सेहवागची फिरकी घेण्याचा प्रयत्न केला, तोही हिंदीत.

राजकोटमधील दुसऱ्या टी ट्वेण्टी सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 40 धावांनी पराभव केला.

यानंतर टेलरने राजकोटमधील एका शिंप्याच्या बंद दुकानाचा फोटो शेअर केला. त्याखालील कॅप्शनमध्ये टेलरने सेहवागला मेन्शन करुन “राजकोटमध्ये मॅच के बाद दर्जी (टेलर) की दुकान बंद, अगली सिलाई त्रिवेंद्रम में होगी, जरुर आना” असं म्हटलं आहे.
https://twitter.com/RossLTaylor/status/927121062239920128

टेलरच्या या ट्विटनंतर सेहवागनेही त्यापुढे मजल मारली. सेहवागने थेट यूआयडीआय अर्थात आधार कार्ड ट्विटर हॅण्डलला मेन्शन करुन, टेलरला आधार कार्डसाठी पात्र असल्याचं म्हटलं.

सेहवाग म्हणाला, “टेलर, तुझ्या भाषेमुळे मी खूपच प्रभावित झालो. @UIDAI टेलरच्या हिंदी भाषेचं कौशल्य पाहता तो आधार कार्डसाठी पात्र ठरेल”

https://twitter.com/virendersehwag/status/927377877187858433

सेहवागच्या या ट्विटनंतर ‘आधार’नेही यामध्ये उडी घेतली. आधारने आपल्या @UIDAI या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन ट्विट करत, “भाषा नाही तर नागरिकत्व महत्त्वाचं आहे”, असा रिप्लाय सेहवागला दिला.

https://twitter.com/UIDAI/status/927392657554341889

त्यावरही सेहवागने कोट करत ट्विट केलं, “तुम्ही कितीही खेळा, पण जिंकतं सरकारच”

https://twitter.com/virendersehwag/status/927392873284292608

यापूर्वीचं ट्विट

यापूर्वी भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या वन डे सामन्यानंतरही टेलर -सेहवागमध्ये ट्विट मस्करी रंगली होती. न्यूझीलंडने हा सामना 6 विकेट्स राखून जिंकला होता.

त्यावेळी सेहवाग म्हणाला होता, '“वेल प्लेड दर्जीजी, दिवाळीतील (कपडे शिवण्याच्या) ऑर्डरच्या दबावानंतरही चांगली कामगिरी केली”

सेहवागच्या या ट्विटला रॉस टेलरने हिंदीत उत्तर दिलं होतं. संबंधित बातमीसाठी क्लिक करा 

सेहवागकडून टेलरचा 'दर्जी' उल्लेख, टेलरचंही हिंदीतून उत्तर

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Virender Sehwag & ross taylors funny twitter conversation
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV