विश्वनाथन आनंदने जिंकली जागतिक रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा

भारताच्या विश्वनाथन आनंदनं रॅपिड बुद्धिबळाच्या जागतिक विजेतेपदावर आपलं नाव कोरून, टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

विश्वनाथन आनंदने जिंकली जागतिक रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा

नवी दिल्ली :  भारताच्या विश्वनाथन आनंदनं रॅपिड बुद्धिबळाच्या जागतिक विजेतेपदावर आपलं नाव कोरून, टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. रियाधमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं.

आनंदनं 2003 साली रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचं जागतिक विजेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर तब्बल 14 वर्षांनी आनंद पुन्हा एकदा रॅपिड बुद्धिबळाचा विश्वविजेता ठरला आहे. या स्पर्धेत त्यानं अपराजित राहण्याचा पराक्रम गाजवला.

माजी विश्वविजेत्या आनंदनं रशियाच्या दोन खेळांडूंसह पंधरापैकी साडेदहा गुणांची समसमान कमाई केली होती. त्यानं टायब्रेकमध्ये रशियाच्या व्लादिमिर फेदोसिव्हवर 2-0 अशी मात करून जागतिक विजेतेपद पटकावलं.

या विजयाने आनंदने जागतिक चॅम्पियन मॅग्नस कार्लसकडून 2013 मधील जागतिक चॅम्पियनशिपमधील पराभवाचा बदला घेतला. कार्लसनने 2013 मधील चॅम्पियनशिपमध्ये विश्वनाथन आनंदचा पराभव केला होता.

तर 2003 मध्ये ब्लादीमिर क्रामनिकचा पराभव करुन रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचं जागतिक विजेतेपद आनंदनं पटकावलं होतं.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: viswanathan-anand-won-the-world-rapid-chess-championship
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV