40 चौकार, 18 षटकार, 82 चेंडूत 279 धावा!

व्यंकटेश रावने राष्ट्रीय अंध चषकात हा विक्रम केला.

40 चौकार, 18 षटकार, 82 चेंडूत 279 धावा!

मुंबई : मुंबईत खेळवल्या गेलेल्या सामन्यात आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश राव या खेळाडूने 82 चेंडूत 279 धावा ठोकल्या. क्रिकेटच्या इतिहासातील हा एक मोठा विक्रम आहे. व्यंकटेश रावने राष्ट्रीय अंध चषकात हा विक्रम केला.

व्यंकटेशने ही खेळी 40 चौकार आणि 18 षटकारांनी सजवली. व्यंकटेशने 268 धावा केवळ चौकार आणि षटकारांनीच मिळवल्या. या दमदार फलंदाजीच्या जोरावर आंध्र प्रदेशने महाराष्ट्रावर 292 धावांनी विजय मिळवला.

आंध्र प्रदेशने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेला महाराष्ट्राचा संघ 20 षटकांमध्ये 88 धावांच्या आत माघारी परतला. या चषकानंतर 17 खेळाडूंची निवड होणार आहे, जे पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 चषकात खेळतील.

हा चषक पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये खेळवला जाणार आहे. विजेत्या संघाला 50 हजार रुपये, तर उपविजेत्या संघाला 30 हजार रुपये बक्षिस दिलं जाईल.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: vyankatesh rao hits 279 runs in 82 balls in blind tournament
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV