...तेव्हा आत्महत्येचा विचार मनात आला होता! : कुलदीप यादव

कोणत्याही डावखुऱ्या फिरकीपटूने बोटांऐवजी मनगटाने चेंडू वळवला, तर त्याला ‘चायनामन’ गोलंदाज म्हटलं जातं.

By: | Last Updated: > Monday, 13 November 2017 11:28 AM
When Chinaman bowler Kuldeep Yadav thought of suicide after cricket selection snub

कानपूर : आपल्या अनोख्या शैलीमुळे अनेकांना कोड्यात पाडणारा चायनामन बॉलर कुलदीप यादवने धक्कादायक खुलासा केला आहे. “आयुष्याच्या एका टप्प्यावर एवढा निराश झालो होतो की, आत्महत्या करण्याचा विचार मनात आला होता,” असं कुलदीप यादवने सांगितलं.

‘तेव्हा आत्महत्येचा विचार मनात आला होता’
कानपूरमध्ये बोलताना कुलदीप यादव म्हणाला की, “मला वयाच्या तेराव्या वर्षी 15 वर्षांखालील संघात खेळायचं होतं. निवड होण्यासाठी मी जीव तोडून मेहनत केली होती. परंतु यानंतरही निवड न झाल्याने मी फारच निराश झालो होतो. त्यामुळे मी आत्महत्या करण्याचं निश्चित केलं होतं. पण निराशेच्या दिवसात वडिलांनी माझं मनधैर्य वाढवलं. त्यामुळे मी आणखी मेहनत करु शकलो.

चायनामन बॉलिंग स्टाईल नाही तर शिवी, संपूर्ण कहाणी

फास्ट बोलर बनण्याचं स्वप्न होतं : कुलदीप
“मजा-मस्तीसाठी मी शाळेत क्रिकेट खेळत असे. पण क्रिकेटमध्ये काहीतरी विशेष करावं, अशी माझ्या वडिलांची इच्छा होती,” असं कुलदीप यादव म्हणाला. तसंच क्रिकेट कारकीर्दीचं श्रेयही त्याने वडिलांना दिलं.

चायनामन बॉलिंग स्टाईल नाही तर शिवी, संपूर्ण कहाणी

“मी लहान असतानाच वडिलांनी मला कोचिंगसाठी पाठवलं. सुरुवातीच्या दिवसात फास्ट बॉलर बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी ट्रेनिंगला जात असे. मात्र माझं कौशल्य पाहून प्रशिक्षकांनी मला फिरकीचं ट्रेनिंग दिलं,” असंही चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने सांगितलं.

82 वर्षांच्या कसोटी इतिहासातला पहिला चायनामन कुलदीप यादव

सोप्या शब्दात ‘चायनामन’ म्हणजे…
कोणत्याही डावखुऱ्या फिरकीपटूने बोटांऐवजी मनगटाने चेंडू वळवला, तर त्याला ‘चायनामन’ गोलंदाज म्हटलं जातं. चायनामन गोलंदाजाचा चेंडू उजव्या हाताच्या फलंदाजासाठी आतल्या बाजूने वळतो, तर डावखुऱ्या फलंदाजांसाठी बाहेरच्या दिशेने वळतो.

Sports News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:When Chinaman bowler Kuldeep Yadav thought of suicide after cricket selection snub
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

बलात्कारप्रकरणी ब्राझीलच्या फुटबॉलपटूला 9 वर्षांची शिक्षा
बलात्कारप्रकरणी ब्राझीलच्या फुटबॉलपटूला 9 वर्षांची शिक्षा

मिलान (इटली) : ब्राझीलचा फुटबॉलपटू रोबिंहोला बलात्कारप्रकरणी तब्बल

केवळ 2 धावात अख्खा संघ आऊट, 9 फलंदाजांचा भोपळा
केवळ 2 धावात अख्खा संघ आऊट, 9 फलंदाजांचा भोपळा

बीसीसीआयच्या एकोणीस वर्षांखालील मुलींच्या वन डे सुपर लीग सामन्यात

'ब्लेड रनर' ऑस्कर पिस्टोरियसच्या शिक्षेत दुप्पटीने वाढ!
'ब्लेड रनर' ऑस्कर पिस्टोरियसच्या शिक्षेत दुप्पटीने वाढ!

केप टाऊन : ‘ब्लेड रनर’ ऑस्कर पिस्टोरियसला गर्लफ्रेण्ड रिव्हा

VIDEO : सुगरण झिवा, चिमुकल्या हातांनी बनवली गोल गोल चपाती!
VIDEO : सुगरण झिवा, चिमुकल्या हातांनी बनवली गोल गोल चपाती!

मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची मुलगी झिवा

'या' फोटोमुळे राहुल द्रविडवर कौतुकाचा पाऊस!
'या' फोटोमुळे राहुल द्रविडवर कौतुकाचा पाऊस!

नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी क्रिकेटर राहुल द्रविड जेवढा शांत आणि

IndvsSL : इशांत, अश्विन आणि जाडेजाने पहिला दिवस गाजवला
IndvsSL : इशांत, अश्विन आणि जाडेजाने पहिला दिवस गाजवला

नागपूर:  भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेचा पहिला डाव अवघ्या 205 धावांत

टीम इंडियाला पंड्याचा पर्याय मिळाला, विराटचीही पसंती
टीम इंडियाला पंड्याचा पर्याय मिळाला, विराटचीही पसंती

नागपूर : जलद गोलंदाज असलेल्या अष्टपैलू खेळाडूचा टीम इंडियाला

स्पेशल रिपोर्ट : धर्माची बंधनं झुगारून ते एक झाले
स्पेशल रिपोर्ट : धर्माची बंधनं झुगारून ते एक झाले

कोल्हापूर/मुंबई : भारताचा माजी क्रिकेटर झहीर खान आणि अभिनेत्री

झहीर आणि सागरिका अखेर विवाहबंधनात!
झहीर आणि सागरिका अखेर विवाहबंधनात!

मुंबई : टीम इंडियाचा माजी गोलंदाज झहीर खान अखेर बोहल्यावर चढला आहे.

कोल्हापूरची अनुजा पाटील टीम इंडियाची कर्णधार
कोल्हापूरची अनुजा पाटील टीम इंडियाची कर्णधार

मुंबई : बांगलादेश ‘अ’ संघाबरोबर भारतात होणाऱ्या वनडे आणि टी 20