पाकमध्ये जाऊन विजयोत्सव करा, फुटीरतावाद्यावर गंभीर बरसला

By: | Last Updated: > Monday, 19 June 2017 11:21 PM
पाकमध्ये जाऊन विजयोत्सव करा, फुटीरतावाद्यावर गंभीर बरसला

नवी दिल्ली : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सामन्यात भारताला पाकिस्तानकडून दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यानंतर दोन्ही देशातून सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस पडू लागला. काश्मिरचा फुटीरतावादी नेता आणि भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीर यांच्यातही सोशल मीडियावर शाब्दिक युद्ध रंगलं.

काश्मिरातील फुटीरतावादी नेते मिरवाईझ उमर फारुक यांच्या ट्वीटनंतर वादाला सुरुवात झाली. ‘सगळीकडे फटाके फुटत आहेत. ईद लवकर आली, असं वाटत आहे. चांगली टीम आज जिंकली. पाकिस्तानी संघाचं अभिनंदन’ असं ट्वीट फारुक यांनी केलं.

फारुक यांच्या ट्वीटमुळे भारताची माजी सलामीवीर गौतम गंभीरचं पित्त चांगलंच खवळलं. ‘मिरवाईझ, तुम्हाला एक सल्ला आहे. तुम्ही सीमा का नाही पार करत. तुम्हाला चांगले फटाके मिळतील (चिनी?) ईद तिकडे साजरी करा. मी तुम्हाला बॅगा भरायला मदत करतो.’ असं ट्वीट गंभीरने केलं.

कालचं ट्वीट ही फारुक यांची पहिली वेळ नव्हती. इंग्लंडला हरवून पाकिस्तान अंतिम फेरीत दाखल झालं, त्यावेळीही त्यांनी फटाक्याचे आवाज ऐकू येत असल्याचं ट्वीट करत पाक संघाला शुभेच्छा दिल्या होत्या.

गौतम गंभीर कायमच भारतीय सैन्याविषयी, देशभक्तीची भावना जागवणारे विचार ट्विटरवर मांडत आला आहे. फारुक यांना हटकल्यानंतर सोशल मीडियावर गंभीरवर कौतुकाचा वर्षाव झाला.

First Published:

Related Stories

लोढा समितीच्या शिफारसी लागू करण्यासाठी बीसीसीआयची समिती
लोढा समितीच्या शिफारसी लागू करण्यासाठी बीसीसीआयची समिती

नवी दिल्ली : लोढा समितीच्या कठोर शिफारशींपासून बीसीसीआयला आणि

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात युवराज सिंहकडून मोठी चूक!
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात युवराज सिंहकडून मोठी चूक!

पोर्ट ऑफ स्पेन : जगभरातील क्रिकेटर आपापल्या स्टाईलसाठी ओळखले जातात.

भारताची घोडदौड, कांगारुंवर मात, टीम इंडियाचा नवा विक्रम
भारताची घोडदौड, कांगारुंवर मात, टीम इंडियाचा नवा विक्रम

पोर्ट ऑफ स्पेन: वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वन डे सामन्यात टीम

कोहलीची सलमानवर मात, फेसबुकवर दुसऱ्या स्थानी विराजमान!
कोहलीची सलमानवर मात, फेसबुकवर दुसऱ्या स्थानी विराजमान!

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून प्रशिक्षकासोबतच्या वादामुळे

बॅटिंगआधी पुस्तक का वाचत होते, मिताली म्हणते...!
बॅटिंगआधी पुस्तक का वाचत होते, मिताली म्हणते...!

लंडन : भारतीय महिला क्रिकेट संघाने शनिवारी यजमान इंग्लंडवर 35

रहाणेचं खणखणीत शतक, भारताचा वेस्ट इंडिजवर 105 धावांनी विजय
रहाणेचं खणखणीत शतक, भारताचा वेस्ट इंडिजवर 105 धावांनी विजय

पोर्ट ऑफ स्पेन: टीम इंडियानं दुसऱ्या वनडेत वेस्ट इंडिजवर 105 धावांनी

मिताली राजने अर्धशतकांच्या बाबतीत विराटलाही मागे टाकलं!
मिताली राजने अर्धशतकांच्या बाबतीत विराटलाही मागे टाकलं!

डर्बी : इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या आयसीसी महिला विश्वचषकात भारतीय

भारताच्या किदंबी श्रीकांतला ऑस्ट्रेलिअन ओपनचं विजेतेपद
भारताच्या किदंबी श्रीकांतला ऑस्ट्रेलिअन ओपनचं विजेतेपद

दिल्ली : भारताच्या किदंबी श्रीकांतला ऑस्ट्रेलिअन ओपन बॅडमिंटन

भारतीय महिला संघाची विश्वचषकात विजयी सलामी
भारतीय महिला संघाची विश्वचषकात विजयी सलामी

डर्बी : इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या आयसीसी महिला विश्वचषकात भारतीय

एवढ्या वाईट पद्धतीने बाद होणारा जेसन रॉय पहिलाच फलंदाज!
एवढ्या वाईट पद्धतीने बाद होणारा जेसन रॉय पहिलाच फलंदाज!

टॉन्टन : इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या टी-20