VIDEO: किमच्या आग्रहाखातर 'तो' स्कर्ट घालून कोर्टवर उतरला!

सामन्याच्या दरम्यान एका फॅननं किम क्लाईस्टर्सला सर्व्हिस कुठे करायची असं विचारलं. त्या फॅनच्या प्रश्नावर एका दुसऱ्या फॅनने सर्व्हिस बॉडीवर करायची असं उत्तर दिलं. ते ऐकल्यानंतर किमनं त्याला थेट मैदानातच खेळायला बोलावलं. पण त्यानंतर तिनं जे केलं. त्याने अख्खा टेनिस कोर्ट खळखळून हसला.

VIDEO: किमच्या आग्रहाखातर 'तो' स्कर्ट घालून कोर्टवर उतरला!

विम्बल्डन: विम्बल्डनमध्ये महिलांचा डबल्स मुकाबला सुरु होता. किम क्लाईस्टर्स या सामन्याचं मुख्य आकर्षण होती. पण एका फॅननं तिला विचारलं. पॉईंट मिळवण्यासाठी सर्व्हिस कुठे करायची? त्याचवेळी एका फॅननं उत्तर दिलं आणि त्यानंतर जे झालं ते भन्नाट होतं.

सामन्याच्या दरम्यान एका फॅननं किम क्लाईस्टर्सला सर्व्हिस कुठे करायची असं विचारलं. त्या फॅनच्या प्रश्नावर एका दुसऱ्या फॅनने सर्व्हिस बॉडीवर करायची असं उत्तर दिलं. ते ऐकल्यानंतर किमनं त्याला थेट मैदानातच खेळायला बोलावलं. पण त्यानंतर तिनं जे केलं. त्याने अख्खा टेनिस कोर्ट खळखळून हसला.

किमनं त्याला आपल्या बॅगमधला चक्क स्कर्ट घालायला दिला. आता किमचा स्कर्ट तिच्या दुप्पट किंवा तिप्पट आकाराच्या त्या महाकाय फॅनच्या पायांमधून चढता चढेना.

पण मनाचा हिय्या करुन त्याने तो चढवला. हा सगळा प्रकार सुरु असताना किम क्लायस्टर्स हसून हसून लोटपोट झाली. हे सगळं सुरु होतं. सामन्यादरम्यान, तेही लाईव्ह. बरं त्याला विम्बल्डनचा ऑफिशियल टीशर्टही दिला गेला.  हे सगळं चढवून पठ्ठ्या खेळण्यासाठी तयार झाला. किमनं सर्व्हिस केली आणि काय आश्चर्य पठ्ठ्यानं सर्व्हिस परतवली.

पण दुसरा शॉट मात्र फेल गेला. किमनं पुन्हा सर्व्हिस केली आणि ती सर्व्हिस मात्र तो परतवू शकला नाही. अत्यंत चुरशीच्या या सामन्यामध्ये त्या एका प्रश्नाने रंगत आणली. सामन्यामधला सामना संपला आणि या सर्वांनी मस्तपैकी एक फोटोसाठी पोज दिली.

बरं स्कर्ट आणि टीशर्ट उतरवताना पुन्हा त्याची किती फजिती झाली हे वेगळं सांगायला नको. असो... विम्बल्डनच्या धीरगंभीर वातावरणात असे हलकेफुलके सामनेही व्हायला हवेत.

VIDEO:

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV