अहमदनगरमध्ये वुमेन्स प्रीमिअर लीगचा थरार

अहमदनगरच्या नगर क्लबवर बंगडीवाला उद्योग समुहाने या क्रेझी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं होतं.

अहमदनगरमध्ये वुमेन्स प्रीमिअर लीगचा थरार

अहमदनगर : देशात सध्या आयपीएलची धामधूम सुरु आहे. खेळाडूंचा लिलावही पार पडला आहे. मात्र अहमदनगरमध्ये महिलांच्या वुमेन्स प्रीमिअर लीगचा थरार सुरु आहे. महिलांनी महिलांसाठी आयोजित केलेली ही क्रेझी मॅच आहे. खेळाबरोबरच आनंद इथे पाहायलो मिळतो.

रंगीबेरंगी जर्सीतील खेळाडू.. चिअरअप करणारे प्रेक्षक...फोर... सिक्स मारताच ...चिअर गर्ल्सचा जल्लोष...चॅम्पियन्स गाण्यावर थिरकणं ... आणि विजेत्या चषकासह नेत्रदीपक फटाक्यांची आतषबाजी. हा सर्व थरार डोळ्यासमोर आल्यानंतर आयपीएलचं चित्र उभं राहतं. मात्र हा सामना वुमेन्स प्रीमिअर लीगचा आहे. अहमदनगरच्या नगर क्लबवर बंगडीवाला उद्योग समुहाने या क्रेझी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं होतं. गेल्या तीन दिवसांपासून ही स्पर्धा सुरु होती.

wpl 4

तीन दिवसीय वुमेन्स प्रीमिअर लीगमध्ये आठ संघांनी सहभाग घेतला.  डे-नाईट एका संघात पंधरा खेळाडूंचा सहभाग होता. गेल्या दोन महिन्यांपासून 120 महिला घरच्या जबाबदार्‍या पार पाडून सराव करत होत्या. विशेष म्हणजे या खेळाडूंना युवा क्रिकेटपटूंनी प्रशिक्षण दिलं. सुरुवातीला बॅट धरण्यापासून शिकवणी सुरु झाली. मल्टीटास्किंग काम करणाऱ्या महिला काही दिवसात तरबेज झाल्या.

wpl 1

वुमेन्स प्रीमिअर लीग या क्रेझी मॅचचे नियमही अगदी भन्नाट होते. एक ओव्हर पाच बॉलची आणि सामना अकरा ओव्हरचा. तर प्रत्येक खेळाडूने गोलंदाजी करायची आणि फलंदाजाला पहिल्याच बॉलवर फ्री हीट मारण्याचा नियम. मात्र सिक्सर मारल्यास तो ही आऊट होणार. तर समोरच्या फलकावर निशाणा साधल्यास आठ रणांची खैरात.

wpl 2

कधी हातात बॅट न धरलेल्या महिलांनीही फोर सिक्स मारले.  धावा काढण्याचा वेग तरुणांनाही लाजवणारा होता. अंतिम सामना मॅजीकल मिडासने निर्विवाद  खिशात घातला. अकरा ओव्हरमध्ये त्यांनी 55 धावा कुटल्या. एकही सामना न हारता त्यांनी महावीर सुपर क्वीन्सचा पराभव केला.

‘भारत की बेटिया रचेंगी इतिहास,’ हे वुमेन्स प्रीमिअर लीगचं घोषवाक्य आहे. या लीगने महिलांना क्रिकेटचा मनमुराद आनंद तर मिळालाच. शिवाय आपलं खेळातील कर्तृत्वही सिद्ध करता आलं. अशाच सामन्यांची अजून व्याप्ती वाढल्यास भारतीय महिला क्रिकेटला अनेक राष्ट्रीय दर्जाचे क्रिकेटपटू मिळतील.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: womens premiere league matches has been organized in Ahmadnagar
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV