महाराष्ट्र केसरी मानाच्या चांदीच्या गदेचे पूजन

महाराष्ट्र केसरी विजेत्या पैलवानाला देण्यात येणाऱ्या मानाच्या चांदीच्या गदेचे आज सकाळी पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय कुस्ती पंच चंद्रकांत मोहोळ आणि संग्राम मोहोळ यांनी केले होते. महाराष्ट्र केसरी कुस्तीला उद्यापासून पुण्याच्या मुळशी तालुक्यातल्या भूगावमध्ये सुरुवात होत आहे.

महाराष्ट्र केसरी मानाच्या चांदीच्या गदेचे पूजन

 

मुंबई : महाराष्ट्र केसरी विजेत्या पैलवानाला देण्यात येणाऱ्या मानाच्या चांदीच्या गदेचे आज सकाळी पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय कुस्ती पंच चंद्रकांत मोहोळ आणि संग्राम मोहोळ यांनी केले होते. महाराष्ट्र केसरी कुस्तीला उद्यापासून पुण्याच्या मुळशी तालुक्यातल्या भूगावमध्ये सुरुवात होत आहे.

महाराष्ट्र केसरीच्या गदेचा ऐतिहासिक वारसा

महाराष्ट्र केसरी पैलवानासाठीच्या चांदीच्या गदेला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. महाराष्ट्र केसरीला 1961 साली सुरुवात झाली. तेव्हापासून चांदीची गदा दिली जाते. 1982 सालापर्यंत ही गदा महाराष्ट्र राज्य कुस्ती परिषदेच्या वतीनं देण्यात येत होती. कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव माजी खासदार अशोक मोहोळ यांनी मामांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र केसरी विजेत्यास गदा देण्याची परंपरा सुरू केली.

महाराष्ट्र केसरी स्पर्धेची घोषणा होताच, अशोक मोहोळ व चंद्रकांत मोहोळ गदा निर्मितीच्या कार्याला सुरुवात करतात. स्पर्धेच्या ठिकाणी ते स्वत: गदा घेऊन जातात.

गदेची रचना

महाराष्ट्र केसरीसाठीच्या गदेची उंची साधारण 27 ते 30 इंच असून, व्यास 9 ते 10 इंच इतका असतो. वजन 8 ते 10 किलो असते. गदा संपूर्ण लाकडी असून, त्यावर चांदीचे नक्षीकाम केले जाते. 28 गेज चांदीचा पत्रा यासाठी वापरला जातो. या गदेवर कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांचे छायाचित्र असते व कुस्तीचे दैवत असणाऱ्या हनुमानाचेही छायाचित्र असते. मागील 34 वर्षांपासून पानगरी कुटुंबीय गदा बनविण्याचे काम करतं

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Worship on maharashtra k
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV