किरण भगतची मनजीतसिंगवर मात, लोखंडी पिंजऱ्यातील कुस्ती जिंकली!

सांगलीतल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर उपस्थित कुस्तीशौकिन सज्ज झाले आहेत एका ऐतिहासिक कुस्तीसाठी.

किरण भगतची मनजीतसिंगवर मात, लोखंडी पिंजऱ्यातील कुस्ती जिंकली!

सांगली : उपमहाराष्ट्र केसरी किरण भगतनं डब्ल्यूडब्ल्यूई पैलवान मनजीतसिंगला सहा मिनिटांत अस्मान दाखवून लोखंडी पिंजऱ्यातली कुस्ती जिंकली. सांगलीतल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर या ऐतिहासिक कुस्तीचं आयोजन करण्यात आलं होतं.

kusti 3

स्वातंत्र्यानंतर लोखंडी पिंजऱ्यात होणारी ही महाराष्ट्रातली पहिलीच कुस्ती होती. त्यामुळं पश्चिम महाराष्ट्रातल्या हजारो कुस्तीशौकिनांनी ही कुस्ती पाहण्यासाठी गर्दी केली होती.

मनजीतसिंग हा किरण भगतपेक्षा वजनानं आणि उंचीनंही भारी होता. त्यामुळं या कुस्तीवर तो वर्चस्व गाजवेल, असा अंदाज होता. पण किरण भगतनं चपळाईनं डाव टाकत आधी मनजीतसिंगवर कब्जा मिळवला आणि मग त्यालाही चीतपटही केलं.

या ऐतिहासिक कुस्तीमध्ये किरण भगतने मनजीतसिंगला आस्मान दाखवलं. लोखंडी पिंजऱ्यातील या  कुस्तीमध्ये किरणने अवघ्या काही मिनिटात मनजितसिंगवर मात केली.

rana da

ही पोलादी कुस्ती जिंकणाऱ्या किरण भगतनं तब्बल 4 लाखांचं बक्षीस पटकावलं आहे. तर उपविजेत्या मनजितसिंगला देखील 1 लाखाचं बक्षीस देण्यात आलं.

या कुस्तीला पाहुणे म्हणून भिडे गुरुजीही उपस्थित होते. त्याचप्रमाणे तुझ्यात जीव रंगला... फेम राणा दा (हार्दिक जोशीने) देखील हजेरी लावली होती. 

VIDEO :

संबंधित बातम्या :

लोखंडी पिंजऱ्यात कुस्ती, आज किरण भगत आणि मनजीतसिंग भिडणार

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: wrestling started between kiran bhagat vs manjeet singh LIVE update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV