बर्थडे स्पेशल: जेव्हा बाळासाहेब म्हणाले होते, झहीर खान खरा हिंदुस्थानी मुसलमान !

महाराष्ट्राच्या नगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये 7 ऑक्टोबर 1978 रोजी जन्मलेल्या झहीर खानने, भारतीय क्रिकेटला भरभरून दिलं.

By: | Last Updated: > Saturday, 7 October 2017 10:57 AM
Zaheer Khan Birthday special : when balasaheb thackeray called zaheer khan as real hindustani muslim

मुंबई: भारताच्या 2011 सालच्या विश्वचषकाच्या विजयाचा हिरो झहीर खानचा आज 39 वा वाढदिवस.

महाराष्ट्राच्या नगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये 7 ऑक्टोबर 1978 रोजी जन्मलेल्या झहीर खानने, भारतीय क्रिकेटला भरभरून दिलं. त्याच्या अनेक अविस्मरणीय खेळी भारतीयांच्या मनात आजही कायम आहे.

भेदक गोलंदाजीमुळे तमाम भारतीयांनी झहीरचं नेहमीचं कौतुक केलं. पण दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या कौतुकाची चर्चा आजही होतेच होते.

झहीर खान खरा हिंदुस्थानी मुसलमान आहे, असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. झहीर खान 2004 मध्ये पहिल्यांदा पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी पाकिस्तानातील आघाडीचं दैनिक ‘डॉन’ने त्याची मुलाखत छापली होती.

यावेळी झहीरला बाळासाहेबांबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.  “तू भारतात – महाराष्ट्रात राहतोस. तिथे बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचं वर्चस्व आहे, याचा तुला एक मुस्लिम म्हणून काही त्रास होतो”? त्यावर झहीरने दिलेल्या उत्तरामुळे शिवसेनाप्रमुखांसह तमाम शिवसैनिकांचा उर अभिमानाने भरून आला होता.

झहीर म्हणाला होता, “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे मुस्लिमविरोधी नाहीत. काही जणांनी स्वत:च्या फायद्यासाठी बाळासाहेबांची इमेज ‘मुस्लिमविरोधी’ अशी बनवली आहे. मात्र भारतातील देशभक्त मुस्लिमांना ठाकरे किंवा शिवसेनेचा कोणताही त्रास नाही. जे विध्वंसक कृतीमध्ये सहभागी असतात, त्यांनाच शिवसेनेचा विरोध आहे”.

झहीर खानच्या या उत्तरामुळे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंसह शिवसैनिक फिदा झाले होते. झहीरने आपल्याला धर्मनिरपेक्ष म्हटल्यामुळे त्याला बाळासाहेबांनी धन्यवाद दिले होते. इतकंच नाही तर बाळासाहेबांनी झहीर खानला ‘खरा हिंदुस्तानी मुसलमान’ असं संबोधलं होतं.

झहीर खानच्या याच मुलाखतीचा उल्लेख नंतर शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’ या दैनिकातही करण्यात आला होता.

Sports News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Zaheer Khan Birthday special : when balasaheb thackeray called zaheer khan as real hindustani muslim
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

आशिया चषकाचं विजेतेपद भारताकडे, मलेशियावर 2-1 ने मात
आशिया चषकाचं विजेतेपद भारताकडे, मलेशियावर 2-1 ने मात

ढाका : भारतीय हॉकी संघाने मलेशियावर 2-1 अशी मात करून आशिया चषकावर आपलं

200 वन डे, 31 शतकं, विराटने पॉन्टिंगला मागे टाकलं
200 वन डे, 31 शतकं, विराटने पॉन्टिंगला मागे टाकलं

मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने न्यूझीलंडविरुद्धच्या

IND vs NZ : टॉस जिंकून भारताची प्रथम फलंदाजी
IND vs NZ : टॉस जिंकून भारताची प्रथम फलंदाजी

मुंबई : भारत विरुद्ध न्यूझीलंड वन डे मालिकेतील पहिल्या सामन्याला

होम ग्राऊंडवर अजिंक्य रहाणेला बाहेर बसावं लागणार?
होम ग्राऊंडवर अजिंक्य रहाणेला बाहेर बसावं लागणार?

मुंबई : सलामीवीर शिखर धवनचं पुनरागमन झाल्यामुळे मुंबईकर फलंदाज

आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारत अंतिम फेरीत, पाकिस्तानवर सलग दुसरा विजय
आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारत अंतिम फेरीत, पाकिस्तानवर सलग दुसरा...

ढाका : भारतीय हॉकी संघानं पाकिस्तानचा 4-0 असा धुव्वा उडवून आशिया

रहाणे तिसऱ्या क्रमांकाचा सलामीवीर फलंदाज : विराट कोहली
रहाणे तिसऱ्या क्रमांकाचा सलामीवीर फलंदाज : विराट कोहली

मुंबई : दमदार फॉर्मात असणारा अजिंक्य रहाणे टीम इंडियाचा तिसरा

दुसऱ्या देशाकडून खेळण्याचे संकेत देणाऱ्या श्रीशांतला BCCIचं उत्तर
दुसऱ्या देशाकडून खेळण्याचे संकेत देणाऱ्या श्रीशांतला BCCIचं उत्तर

दुबई : पुन्हा आजन्म बंदी घातल्यानंतर क्रिकेटर एस.श्रीशांतने

तो माझा शेवटचा सामना असेल: अश्विन
तो माझा शेवटचा सामना असेल: अश्विन

मुंबई: टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू आर अश्विनने  मोठा निर्णय जाहीर

सचिनकडून सेहवागला वाढदिवसाच्या 'उलट्या शुभेच्छा'
सचिनकडून सेहवागला वाढदिवसाच्या 'उलट्या शुभेच्छा'

मुंबई : टीम इंडियाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग आज आपला 39वा वाढदिवस

15 चौकार, 7 षटकार, बांगलादेशविरोधात डिव्हिलयर्सची तुफानी खेळी
15 चौकार, 7 षटकार, बांगलादेशविरोधात डिव्हिलयर्सची तुफानी खेळी

पार्ल : कर्णधारपद सोडल्यानंतर पहिलाच सामना खेळणारा दक्षिण