1200 नोकऱ्या जाणार, आरकॉम वायरलेस व्यवसाय बंद करणार?

रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या जवळपास बाराशे कर्मचाऱ्यांचं भवितव्य अंधारात आहे.

1200 नोकऱ्या जाणार, आरकॉम वायरलेस व्यवसाय बंद करणार?

मुंबई:  अनिल अंबानी यांची आरकॉम म्हणजेच रिलायन्स कम्युनिकेशन कंपनी वायरलेस बिजनेस सेवा बंद करण्याच्या तयारीत आहेत. यामुळे रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या जवळपास बाराशे कर्मचाऱ्यांचं भवितव्य अंधारात आहे.

'30 नोव्हेंबरपर्यंतच तुम्ही कंपनीचे कर्मचारी आहात' अशी माहिती आरकॉमने आपल्या कर्मचा-यांना दिली असल्याचं वृत्त इकोनॉमिक टाइम्सनं दिलं आहे.

मुकेश अंबानींच्या जिओद्वारे मोफत कॉलिंग आणि स्वस्त इंटरनेटचा आरकॉमच्या व्यवहारावर परिणाम झाल्याचं कंपनीने म्हटलंय. आजपासून तीस दिवसांत वायरलेस बिझनेस बंद होईल , कोणत्याही परिस्थितीत आपण 30 दिवसांपेक्षा जास्त दिवस हा बिझनेस सुरू ठेऊ शकत नाही, असं आरकॉमचे सीईओ आणि कार्यकारी निदेशक गुरदीप सिंह यांनी म्हटलं आहे.

टेक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: 1,200 May Lose Jobs at RCom
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV