गुगल पिक्सेल XL च्या किंमतीत तब्बल 36000 रुपयांची कपात

अमेझॉनवर या फोनची किंमत 76 हजारांहून 39 हजार 999 रुपये करण्यात आली आहे.

गुगल पिक्सेल XL च्या किंमतीत तब्बल 36000 रुपयांची कपात

मुंबई : गुगलच्या पिक्सेल XL फोनच्या किंमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. अमेझॉनवर या फोनची किंमत 76 हजारांहून 39 हजार 999 रुपये करण्यात आली आहे. म्हणजेच या फोनची किंमत 36 हजार रुपयांनी कमी झाली आहे. तर पिक्सेल 2XL च्या किंमतीतही कपात करण्यात आली असून हा फोन फ्लिपकार्टवर 49 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे.

गुगल पिक्सेल 2 च्या 64GB व्हेरिएंटची किंमत 61 हजार रुपये, तर 128GB व्हेरिएंटची किंमत 70 हजार रुपये आहे.

पिक्सेल 2 आणि पिक्सेल 2 XL चे फीचर्स

पिक्सेल 2 मध्ये जुन्या पिक्सेल फोनप्रमाणेच 5 इंच आकाराची स्क्रीन देण्यात आली आहे. तर पिक्सेल 2 XL मध्ये 6 इंच आकाराची स्क्रीन आहे. हे फोन दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असतील. 64GB आणि 128GB व्हेरिएंटमध्ये हे फोन तुम्हाला खरेदी करता येतील. दोन्ही फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 835 प्रोसेसर आणि 4GB रॅम देण्यात आली आहे.

कॅमेऱ्याचं वैशिष्ट्य काय?

पिक्सेल 2 आणि पिक्सेल 2 XL वॉटरप्रूफ डिझाईनसह IP 67 सर्टिफाईड आहेत. कॅमेरा हे या फोनचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. या फोनमध्ये ड्युअल सेन्सर टेक्निक देण्यात आली आहे. शिवाय पिक्सेल 2 मध्ये स्पेशल पोर्ट्रेट मोडही देण्यात आला आहे.

दोन्ही फोनमध्ये 12.2 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा आहे. तर सेल्फीसाठी 8 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे.

फोनमध्ये ई-सिम सपोर्ट देण्यात आला आहे. म्हणजेच फोनमध्ये इंटिग्रेटेड सिम असतील. अँड्रॉईडची लेटेस्ट ओरियो 8.0 ही सिस्टम या फोनमध्ये असेल. चांगल्या साऊंड क्वालिटीसाठी स्टेरियो स्पीकर देण्यात आला आहे.

टेक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: 36 thousand price cut of google pixel xl
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV