भारतात पहिल्यांदाच 5G ची झलक, स्पीड पाहून थक्क व्हाल

अत्यंत कमी वेळेत म्हणजे 3 मिली सेकंदात 5.7 गीगा बाईट प्रती सेकंद एवढं स्पीड मिळालं.

भारतात पहिल्यांदाच 5G ची झलक, स्पीड पाहून थक्क व्हाल

नवी दिल्ली : भारतात नवीन 5G सेवेसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी एरिक्सनने पहिल्यांदाच एंड टू एंड सादरीकरण केलं. या सेवेची सुरुवात करण्यासाठी एरिक्सनने भारतातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी एअरटेलशी भागीदारी केली आहे.

हे सादरीकरण एरिक्सनच्या 5G टेस्ट बेड आणि 5G न्यू रेडिओ (एनआर) कडून करण्यात आलं. ज्यामध्ये अत्यंत कमी वेळेत म्हणजे 3 मिली सेकंदात 5.7 गीगा बाईट प्रती सेकंद एवढं स्पीड मिळालं.

5G ची सुरुवात झाल्यानंतर भारतीय दूरसंचार कंपन्यांमध्ये 2026 पर्यंत 27.3 अब्ज महसूल निर्माण करण्याची क्षमता असल्याचं एरिक्सनच्या अभ्यासात म्हटलं आहे.

भारत सरकारने 2020 पर्यंत 5G ची सुरुवात करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. त्यादृष्टीने प्रयत्न करत असल्याचं एरिक्सनने म्हटलं आहे. दरम्यान सरकारने यासाठी काही दिवसांपूर्वीच एका समितीची स्थापना केली आहे, जी 5G सेवा भारतात आणण्यासाठी महत्त्वाच्या उपाययोजना करणार आहे.

भारतीय टेलिकॉम क्षेत्रात आधी 2जी, 3जी आणि आता 4जीची चलती आहे. मात्र, आता याही पुढे जात 5जी येत आहे. स्वीडनमधील इलेक्ट्रॉनिक उपकरणं बनवणाऱ्या एरिक्सन कंपनीने यासाठी पुढाकार घेतला आहे.

संबंधित बातम्या :


देशात 2020 पर्यंत 5G चं युग सुरु होणार!


5G तंत्रज्ञानासाठी एरिक्सनचा पुढाकार, IIT दिल्लीसोबत करार


नोकियाच्या मदतीने BSNL, एअरटेल ‘5G’ क्रांती करणार


एअरटेल नोकियाच्या सहकार्याने लवकरच 5G सेवा देणार

टेक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: 5g technology showcase has been organized for first time in india
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV