84जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग; Airtel आणि ideaचा नवा प्लॅन!

या नव्या प्लॅनमध्ये यूजर्सला दररोज 1 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे.

By: | Last Updated: > Tuesday, 10 October 2017 9:19 AM
airtel and idea Rs 495 plan for new customers latest update

 

मुंबई : रिलायन्स जिओच्या प्रत्येक टेरिफ प्लॅनला टक्कर देण्यासाठी आता आयडिया आणि एअरटेल या दोन्ही टेलिकॉम कंपन्यांनी नवनवे प्लॅन लाँच करत आहेत. जिओच्या 399 रुपयांच्या प्लॅनला टक्कर देण्यासाठी आता आयडिया आणि एअरटेलनं 495 रुपये किंमतीचा नवा प्लॅन आणला आहे.

 

या नव्या प्लॅनमध्ये यूजर्सला दररोज 1 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे. हा प्लॅन 84 दिवसांसाठी वैध असणार आहे. ज्यामध्ये 84 जीबी डेटा मिळणार आहे. एअरटेल आणि आयडियाच्या या प्लॅनमध्ये दररोज 300 मिनिट आणि एका आठवड्यात 1200 मिनिटांपर्यंत फ्री कॉलिंग आहे. हा प्लॅन नव्या प्रीपेड यूजर्ससाठी असणार आहे.

 

रिलायन्स जिओच्या 399 रुपयाच्या प्लॅनमध्ये 84 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग देण्यात आलं आहे. जर तुम्ही नवे यूजर असाल तर तुम्हाला 99 रुपयात जिओची मेंबरशीप घ्यावी लागेल. म्हणजेच या प्लॅनसाठी तुम्हाला 498 रुपये मोजावे लागतील.

 

दरम्यान, याशिवाय एअरटेलनं 549 आणि 999 रुपये किंमतीचे दोन नवे प्लॅनही लाँच केले आहेत. ज्यामध्ये अनुक्रमे 2जीबी आणि 4 जीबी डेटा दररोज मिळणार आहे.

 

(नोट : या प्लॅननुसार रिचार्ज करण्यापूर्वी हा प्लॅन तुमच्या नंबरसाठी वैध आहे किंवा नाही याची खात्री संबंधित कंपनीच्या वेबसाईट किंवा अॅपवरुन करा.)

Technology News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:airtel and idea Rs 495 plan for new customers latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

जिओ ग्राहकांना दणका, डेटा पॅकमध्ये कपात
जिओ ग्राहकांना दणका, डेटा पॅकमध्ये कपात

मुंबई : तुम्ही जर रिलायन्स जिओ वापरत असला, तर तुमच्यासाठी महत्वाची

जिओ फीचर फोनला टक्कर, Micromaxचा Bharat-1 लाँच
जिओ फीचर फोनला टक्कर, Micromaxचा Bharat-1 लाँच

मुंबई : रिलायन्स जिओचा 4जी फीचरफोनला टक्कर देण्यासाठी

गंडवागंडवी करणाऱ्यांना चाप, व्हॉट्सअॅपचं नवं फीचर
गंडवागंडवी करणाऱ्यांना चाप, व्हॉट्सअॅपचं नवं फीचर

मुंबई: लोकप्रिय मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने नवं फीचर आणलं आहे. यापुढे

सॅमसंग दिवाळी धमाका, गॅलक्सी S8+ सह अनेक स्मार्टफोनवर सूट 
सॅमसंग दिवाळी धमाका, गॅलक्सी S8+ सह अनेक स्मार्टफोनवर सूट 

मुंबई : सॅमसंगनं आपला खास स्मार्टफोन गॅलक्सी S8+च्या किंमतीत तब्बल 6,000

आठ दिवसातून फक्त एकदाच चार्ज करा, ‘रेडमी 5A’ लॉन्च
आठ दिवसातून फक्त एकदाच चार्ज करा, ‘रेडमी 5A’ लॉन्च

नवी दिल्ली : शाओमीने बजेट स्मार्टफोन ‘रेडमी 5A’ लॉन्च केला आहे. हा

जिओ फीचर फोनसाठी बुकींग पुन्हा सुरु होणार!
जिओ फीचर फोनसाठी बुकींग पुन्हा सुरु होणार!

मुंबई : रिलायन्स जिओचा फीचर फोन खरेदी करण्याची पुन्हा एकदा संधी

सोशल मीडियावर सुरु असलेलं #Metoo अभियान काय आहे?
सोशल मीडियावर सुरु असलेलं #Metoo अभियान काय आहे?

मुंबई : लैंगिक शोषणाविरोधात ट्विटर, फेसबुक यांसारख्या सोशल

399 रुपयात 90 जीबी डेटा, Vodafoneचा खास प्लॅन
399 रुपयात 90 जीबी डेटा, Vodafoneचा खास प्लॅन

मुंबई : रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी व्होडाफोननं आता नवा प्लॅन

छुपा कॅमेरा, वाय-फाय आणि चार्जिंग... भन्नाट Smart Wallet लाँच!
छुपा कॅमेरा, वाय-फाय आणि चार्जिंग... भन्नाट Smart Wallet लाँच!

मुंबई : ट्रेनच्या किंवा बसच्या प्रवासात पाकीट गहाळ झाल्याचं आपण

सॅमसंगचा गॅलक्सी J2 (2017) लाँच, किंमत 7,350 रुपये
सॅमसंगचा गॅलक्सी J2 (2017) लाँच, किंमत 7,350 रुपये

  मुंबई : सॅमसंगनं गॅलक्सी J2 (2017) हा बजेट स्मार्टफोन भारतात लाँच केला