जिओनंतर आता एअरटेलचीही VoLTE सेवा, मुंबईतून सुरुवात

VoLTE सेवेमुळे ग्राहकांना आता डेटाद्वारे व्हॉईस कॉलिंगचा आनंद घेता येईल. यापूर्वी डेटाद्वारे व्हॉईस कॉलिंग देणारी जिओ ही भारतातील एकमेव कंपनी होती.

जिओनंतर आता एअरटेलचीही VoLTE सेवा, मुंबईतून सुरुवात

मुंबई : रिलायन्स जिओनंतर आता एअरटेलनेही VoLTE सेवेची सुरुवात केली आहे. मुंबईतून या सेवेला सुरुवात करण्यात आली. VoLTE सेवा देणारी एअरटेल भारतातील दुसरी दूरसंचार कंपनी ठरली आहे. एअरटेलचे 26 कोटींपेक्षा जास्त ग्राहक आहेत.

व्हॉईस ओव्हर लाँग टर्म इव्होल्युशन म्हणजे VoLTE सेवेमुळे ग्राहकांना आता डेटाद्वारे व्हॉईस कॉलिंगचा आनंद घेता येईल. यापूर्वी डेटाद्वारे व्हॉईस कॉलिंग देणारी जिओ ही भारतातील एकमेव कंपनी होती.

VoLTE सेवा सध्या केवळ मुंबईतील ग्राहकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मार्चपर्यंत ही सेवा देशभरातील ग्राहकांसाठी उपलब्ध करुन देण्यात येईल. या सेवेसाठी ग्राहकांना कोणतंही अतिरिक्त शुल्क देण्याची गरज नाही, असं एअरटेलने म्हटलं आहे.

जिओची VoLTE सेवा केवळ 4G नेटवर्कवरच उपलब्ध आहे. मात्र एअरटेलचे 2G आणि 3G ग्राहकही डेटाद्वारे व्हॉईस कॉलिंग करु शकतात. यामुळे ग्राहकांना कनेक्टिव्हिटीची अडचण येणार नाही. ही टेक्निक केवळ एअरटेलकडेच असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

टेक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV