रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलचा नवा टेरिफ प्लॅन

एअरटेलनं यूजर्ससाठी 199 रुपयांचा नवा प्लॅन आणला आहे. यामध्ये 4जी, 3जी आणि 2जी यूजर्सला 1 जीबी डेटा मिळणार आहे.

रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलचा नवा टेरिफ प्लॅन

मुंबई : रिलायन्स जिओच्या टेरिफ प्लॅनला टक्कर देण्यासाठी प्रत्येक दूरसंचार कंपनी गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न करत आहेत. आता पुन्हा एकदा एअरटेलनं एक नवा टेरिफ प्लॅन लाँच केला आहे.

यामध्ये एअरटेलनं यूजर्ससाठी 199 रुपयांचा नवा प्लॅन आणला आहे. यामध्ये 4जी, 3जी आणि 2जी यूजर्सला 1 जीबी डेटा मिळणार आहे. तसंच अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगही मिळणार आहे. हा प्लॅन प्रीपेड यूजर्ससाठी असणार आहे. ज्याची वैधता 28 दिवसांसाठी असणार आहे.

मात्र, यामध्ये दिवसामध्ये 300 मिनिट आणि आठवड्यात 1200 मिनिटांपर्यंत व्हॉईस कॉलिंग करता येणार आहे.

यासोबतच एअरटेलनं 178 रुपयांचा प्लॅनही लाँच केला आहे. नव्या ग्राहकांसाठी हा प्लॅन लाँच करण्यात आला आहे. या प्लॅनमध्येह यूजर्सला 1 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग देण्यात आलं आहे. याची वैधता 28 दिवसांसाठी असणार आहे. नव्या यूजर्ससाठी हा प्लॅन फक्त पहिल्या आणि दुसऱ्या रिचार्जसाठी असणार आहे.

रिलायन्स जिओच्या 149 रुपयांच्या प्लॅनला टक्कर देण्यासाठी एअरटेलनं हा नवा प्लॅन आणला आहे.

दरम्यान, एअरटेलनं नुकताच 999 रुपयांचा प्लॅन लाँच केला होता. ज्यामध्ये यूजर्सला तब्बल 112 जीबी डेटा मिळणार आहे. या सर्व ऑफर एअरटेलच्या माय एअरटेल अॅपवर उपलब्ध आहेत.

(नोट : या प्लॅननुसार रिचार्ज करण्यापूर्वी हा प्लॅन तुमच्या नंबरसाठी वैध आहे किंवा नाही याची खात्री संबंधित कंपनीच्या वेबसाईट किंवा अॅपवरुन करा.)

टेक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV