399 रुपयात 84 GB डेटा, एअरटेलची ऑफर

या डेटासोबत ग्राहकांना अनलिमिटेड एसटीडी-लोकल व्हॉईस कॉलिंगही मिळणार आहे. रिलायन्स जिओच्या 399 रुपयांच्या धन धना धन ऑफरप्रमाणेच ही ऑफर आहे.

399 रुपयात 84 GB डेटा, एअरटेलची ऑफर

मुंबई : देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी एअरटेलने रिलायन्स जिओला जोरदार टक्कर दिली आहे. कंपनीने 399 रुपयांचा प्लॅन आणला आहे, ज्यामध्ये प्रीपेड ग्राहकांना दररोज 1GB डेटा 84 दिवसांसाठी मिळणार आहे.

या डेटासोबत ग्राहकांना अनलिमिटेड एसटीडी-लोकल व्हॉईस कॉलिंगही मिळणार आहे. रिलायन्स जिओच्या 399 रुपयांच्या धन धना धन ऑफरप्रमाणेच ही ऑफर आहे.

एअरटेलच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार ही ऑफर केवळ 4G ग्राहकांसाठी आहे. म्हणजे तुमच्याकडे 4G मोबाईल असेल, तरच तुम्हाला या ऑफरचा लाभ मिळेल. हा एक स्पेशल प्लॅन असून इतर कोणत्याही प्लॅनसोबत घेतला जाऊ शकत नाही, असं कंपनीने स्पष्ट केलं आहे.

यापूर्वी रिलायन्स जिओने धन धना धन ही नवीन ऑफर आणली होती. जिओकडून या ऑफरमध्ये 84 दिवसांसाठी दररोज 1GB डेटा आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग देण्यात आली आहे.

(नोट : संबंधित ऑफरनुसार रिचार्ज करण्यापूर्वी तुमच्या नंबरसाठी ही ऑफर आहे किंवा नाही, याची कंपनीच्या वेबसाईट किंवा अॅपवरुन खात्री करा)

टेक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV