लवकरच एअरटेलचा 4जी स्मार्टफोन येणार!

रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी आता भारती एअरटेल 2500-2700 रुपये किंमतीचा 4जी स्मार्टफोन आणण्याच्या तयारीत आहे.

लवकरच एअरटेलचा 4जी स्मार्टफोन येणार!

मुंबई : रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी आता भारती एअरटेल 2500-2700 रुपये किंमतीचा 4जी स्मार्टफोन आणण्याच्या तयारीत आहे. याबाबत सध्या त्यांची मोबाइल बनवणाऱ्या कंपन्यांशी बातचीत सुरु आहे.

सुत्रांच्या मते, एअरटेलचा 4जी स्मार्टफोन दिवाळीच्या आधीच बाजारात येऊ शकतो. या फोनसोबत कंपनी अनेक आकर्षक टेरिफ प्लॅन देण्याची शक्यता आहे.

या स्मार्टफोनमध्ये ड्यूल सिम, चार इंच डिस्प्ले, ड्यूल कॅमेरा असे फीचर असू शकतात. यासोबतच 1 जीबी रॅमही यात असेल.

पण या स्मार्टफोनची बुकींग कधीपासून सुरु होणार याबाबत नेमकी माहिती समजू शकलेली नाही. दरम्यान, एअरटेलनं मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

दरम्यान, जिओचा फीचर फोन हा चक्क फुकटात मिळणार आहे. पण या फोनसाठी 1500 रुपये डिपॉझिट द्यावं लागणार आहे. हे पैसे ग्राहकांना तीन वर्षांनी परत मिळतील.

टेक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV