Amazon 'ग्रेट इंडियन फेस्टिव्हल' सेलमध्ये जबरदस्त ऑफर्स

ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टनंतर आता अमेझॉन इंडियाचा देखील सेल सुरु झाला आहे.

Amazon 'ग्रेट इंडियन फेस्टिव्हल' सेलमध्ये जबरदस्त ऑफर्स

मुंबई : ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टनंतर आता अमेझॉन इंडियाचा देखील सेल सुरु झाला आहे. सण आणि उत्सवाचा मुहूर्त साधत अमेझॉननं 'ग्रेट इंडियन फेस्टिव्हल' हा सेल सुरु केला आहे.

हा सेल 21 सप्टेंबर ते 24 सप्टेंबरपर्यंत असणार आहे. यामध्ये अनेक ऑफर देण्यात आल्या आहेत. तसंच एचडीएफसीच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डवरुन खरेदी केल्यास 10 टक्के कॅशबॅक ऑफरही देण्यात आली आहे. मात्र ही कॅशबॅक यूजर्सच्या खात्यात 24 डिसेंबर 2017ला जमा होणार आहे.

या सेलमध्ये 4जी स्मार्टफोन्सशिवाय फ्रिज आणि अनेक इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्टवर भरघोस सूट देण्यात आली आहे. तसेच अमेझॉनच्या अॅपवरुन खरेदी केल्यास यूजर्सला आणखीही काही सरप्राईज ऑफर मिळणार आहेत.

500 रुपयांहून अधिक खरेदी केल्यास यूजर्सला अनेक खास ऑफर मिळणार आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन्सवर तब्बल 40 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे. तर इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर 60 टक्क्यांपर्यंत सूट मिळणार आहे.

तर टीव्हीच्या खरेदीवर देखील 40 टक्के सूट देण्यात आली आहे. तसेच लॅपटॉप फक्त 15,000 रुपयात खरेदी करता येणार आहे. तर एसीच्या खरेदीवर 10,000 रुपयांपर्यंतची सूट मिळणार आहे आणि वॉशिंग मशीनवरही 25 टक्के सूट आहे. यासारख्या अनेक ऑफर सध्या अमेझॉनवर देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना सध्या सुवर्णसंधी आहे.

संबंधित बातम्या : 

फ्लिपकार्टचा 'बिग बिलियन डेज' सेल सुरु, अनेक खास ऑफर 

टेक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV