अॅमेझॉनचा ग्रेट इंडिया सेल सुरु, ग्राहकांसाठी जबरदस्त ऑफर

अॅमेझॉनचा ग्रेट इंडिया सेल सुरु, ग्राहकांसाठी जबरदस्त ऑफर

मुंबई: अॅमेझॉन इंडियानं आपल्या ग्राहकांसाठी 'ग्रेट इंडिया सेल सुरु केला आहे. हा सेल 11 मे ते 14 मे पर्यंत असणार आहे. यामध्ये अनेक इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर अनेक वस्तू खास ऑफरमध्ये उपलब्ध असणार आहे.

अॅमेझॉन ग्रेट इंडिया सेलमधील खास ऑफर:

आयफोन 7 (32 जीबी): अॅमेझॉनवर या सेलमध्ये अनेक ऑफर देण्यात आल्या आहेत. यामध्ये सर्वात खास ऑफरमध्ये म्हणजे आयफोन 7 स्मार्टफोनच्या किंमतीत घसघशीत सूट. आयफोन 7 32 जीबीच्या स्मार्टफोनची किंमत 60000 रुपये आहे. पण यावर जबरदस्त सूट मिळणार असून हा स्मार्टफोन 43,999 रुपयात उपलब्ध असणार आहे.
रेडमी 4A : हा स्मार्टफोन अवघ्या 5999 रुपयात उपलब्ध आहे. हा बजेट स्मार्टफोन असून यामध्ये अनेक फीचर्सही आहेत.

व्होल्टास स्पील्ट एसी: सध्या उन्हाळा सुरु असून अनेक जण एसी खरेदी करतात. हीच गोष्ट लक्षात घेऊन अॅमेझॉननं एसीवरही खास ऑफर दिली आहे. 40,490 किंमत असलेला हा एसी या सेलमध्ये 25,990 किंमतीला उपलब्ध आहे.
जीबीएल हेडफोन आणि स्पीकर: जेबीएलच्या हेडफोन आणि स्पीकरवरही बरीच सूट देण्यात आली आहे. 896 रुपयात जेबीएलचे हेडफोन उपलब्ध आहेत.

टेक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV