अनुष्का शर्माने केलेलं ट्विट ठरलं यंदाचं गोल्डन ट्विट

विराट आणि अनुष्का शर्मा हे 11 डिसेंबरला लग्नबंधनात अडकले. मात्र याच लग्नाने एक अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे.

अनुष्का शर्माने केलेलं ट्विट ठरलं यंदाचं गोल्डन ट्विट

मुंबई: यंदाच्या वर्षात सर्वाधिक चर्चील्या गेलेल्या विषयांपैकी एक म्हणजे टीम इंडियाच कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा विवाह होय.

विराट आणि अनुष्का शर्मा हे 11 डिसेंबरला लग्नबंधनात अडकले. मात्र याच लग्नाने एक अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे.

अनुष्का शर्माने लग्नाच्या फोटोसह केलेला ट्विट हा यंदाचा गोल्डन ट्विट ठरला आहे.

अनुष्काचा हा ट्विट यंदाचा सर्वाधिक रिट्विट केलेला ट्विट ठरला आहे, असं ट्विटरने अधिकृतरित्या जाहीर केलं आहे.

“आज आम्ही आयुष्यभर एकमेकांसोबत राहण्याचं वचन घेतलं. ही बातमी तुमच्याशी शेअर करताना मला आनंद होतोय. आमचं कुटुंब, चाहते आणि हितचिंकांनी आजचा दिवस आणखी खास बनवला. आमच्या या खास क्षणात सहभागी होणाऱ्या सर्वांचे आभार” असं ट्विट अनुष्काने केलं होतं.हे ट्विट जवळपास 60 हजार जणांनी रिट्विट केलं आहे. तर या ट्विटला 3 लाख 89 हजार लाईक्स आणि 43 हजार रिप्लाय आले आहेत.

दरम्यान, विराट कोहलीनेही लग्नानंतर अशाच आषयाचं ट्विट दुसऱ्या फोटोसह केलं होतं. या ट्विटला जवळपास 91 हजार जणांनी रिट्विट केलं आहे.

अनुष्काला 60 हजार आणि विराटला 91 हजार पण तरीही अनुष्काचं ट्विट सर्वाधिक रिट्विट कसं, असा प्रश्न पडला असेल, पण बॉलिवूडमध्ये सर्वाधिक रिट्विट मिळालेलं ट्विट म्हणून याचा उल्लेख करण्यता आला आहे.

सिनेमा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: Anushka Sharma’s wedding announcement is Golden tweet of the year
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV