अमेझॉनचा अॅपल फेस्ट सेल, iPhonesवर बंपर सूट

या सेलमध्ये एक आठवड्यापर्यंत अॅपलचे आयफोन, आयपॅड, मॅकबुक, घड्याळावर बंपर सूट देण्यात आली आहे.

अमेझॉनचा अॅपल फेस्ट सेल, iPhonesवर बंपर सूट

 

मुंबई : फ्लिपकार्ट अॅपल वीकनंतर आता अमेझॉनने अॅपल फेस्ट सेल सुरु केला आहे. या सेलमध्ये एक आठवड्यापर्यंत अॅपलचे आयफोन, आयपॅड, मॅकबुक, घड्याळावर बंपर सूट देण्यात आली आहे. हा सेल 12 मार्चपर्यंत सुरु असणार आहे.

आयफोन X : अॅपलचा लेटेस्ट मॉडेल आयफोन X सध्या 8,000 रुपयांची सूट देण्यात आली आहे. 64 जीबीचा हा स्मार्टफोन 81,000 रुपयांना खरेदी करता येणार आहे. याशिवाय 256 जीबीचा मॉडेल 93,999 रुपयांना खरेदी करता येईल. बाजारात या स्मार्टफोनची किंमत 102,000 रुपये आहे.

आयफोन 8 : या सेलमध्ये आयफोन 8 च्या 64 जीबी व्हेरिएंटवर 9000 रुपयांची सूट देण्यात आली आहे. हा फोन 54,999 रुपयात खरेदी करता येणार आहे. तर 256 जीबीच्या स्मार्टफोनवर 7000 रुपयांची सूट देण्यात आली असून तो फोन 69,999 रुपयांना खरेदी करता येईल.

आयफोन 8 प्लस : या स्मार्टफोन 10 टक्के सूट देण्यात आली आहे. याचा 64 जीबी व्हेरिएंट 65,999 रुपयांना खरेदी करता येईल. तर 256 जीबी मॉडेल 79,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. तसचं या मॉडेलवर 16,257 रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरही देण्यात आली आहे.

आयफोन 7, आयफोन 7 प्लस : आयफोन 7च्या 32 जीबी व्हेरिएंटवर 8000 रुपयांपर्यंत सूट देण्यात आली आहे. त्यामुळे हा फोन 41,999 रुपयात खरेदी करता येणार आहे. तर आयफोन 7 प्लसवर 3 टक्के सूट देण्यात आली असून हा स्मार्टफोन 65,995 रुपयात खरेदी करता येईल.

आयफोन 6s : अॅपल फेस्टमध्ये आयफोन 6s वर 6000 रुपये सूट देण्यात आली आहे. त्यामुळे हा फोन 33,999 रुपयांना खरेदी करता येईल.

आयफोन SE : याचा 32 जीबी व्हेरिएंट 17,999 रुपयात खरेदी करता येणार आहे. या सेलमध्ये या स्मार्टफोनवर तब्बल 8,000 रुपयांची सूट देण्यात आली आहे.

टेक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: apple fest huge discount on iphones latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV