आयफोन 8 सोबत आयफोन 7s लाँच होणार, फोटो व्हायरल

इंटरनेटवर सध्या आयफोन 7 एसच्या डमी मॉडेलचे फोटो लीक झाले आहेत. ‘द व्हर्ज’च्या वृत्तानुसार आगामी आयफोन 7 एसमध्ये वायरलेस चार्जिंग फीचर देण्यात येणार आहे.

आयफोन 8 सोबत आयफोन 7s लाँच होणार, फोटो व्हायरल

मुंबई : अॅपलचा आगामी फोन आयफोन 8 सोबत आयफोन 7 चं नवीन अपडेटेड व्हर्जन आयफोन 7 एस देखील लाँच होणार असल्याची माहिती आहे. इंटरनेटवर सध्या आयफोन 7 एसच्या डमी मॉडेलचे फोटो लीक झाले आहेत.

‘द व्हर्ज’च्या वृत्तानुसार आगामी आयफोन 7 एसमध्ये वायरलेस चार्जिंग फीचर देण्यात येणार आहे.

सध्या आयफोन 8 ची बाजारात जोरदार चर्चा सुरु आहे. मात्र त्यातच आयफोन 7 एस विषयी अनेक वृत्त समोर आले आहेत. अॅपल पुढील महिन्यात तीन फोन लाँच करण्याची शक्यता आहे.

आयफोन 8 च्या स्क्रीनचा आकार 5.8 इंच असेल. तर बॉडी आयफोन 7 एवढीच असेल. मात्र आयफोन 7 मध्ये 4.7 इंच आकाराची स्क्रीन देण्यात आली होती. दरम्यान आयफोन 8 मध्ये इन-स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात येईल का, याबाबतचा सस्पेंस अजून कायम आहे.

टेक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV