कॅम्पस प्लेसमेंटसाठी अॅपल पहिल्यांदाच भारतात येणार!

भारतातली ही पहिलीच संस्था आहे, ज्यामधून विद्यार्थ्यांना अॅपल नोकरीची संधी देणार आहे.

By: | Last Updated: > Tuesday, 7 November 2017 9:17 AM
Apple to come in India for first time to take campus placements

नवी दिल्ली : जगातली सर्वात मोठी कंपनी आणि टेक जगतातलं मोठं नाव अॅपल पहिल्यांदाच भारतात कॅम्पस प्लेसमेंटसाठी येणार आहे. अॅपल आयआयटी हैदराबादमध्ये कॅम्पस प्लेसमेंटसाठी येईल. भारतातली ही पहिलीच संस्था आहे, ज्यामधून विद्यार्थ्यांना अॅपल नोकरीची संधी देणार आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने याबाबत वृत्त दिलं आहे. आयआयटी हैदराबादचे प्लेसमेंट प्रमुख देवीप्रसाद यांनी याबाबत माहिती दिली आहे. अॅपल येणार असल्यामुळे आनंद आहे. अॅपलला कशा प्रकारचे विद्यार्थ्यांचा शोध आहे, हे सांगता येणार नाही. मात्र संस्थेतील विद्यार्थ्यांना ही आपली बौद्धिक क्षमता दाखवण्याची सर्वात चांगली संधी आहे, असं देवीप्रसाद यांनी सांगितलं.

याशिवाय गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि फिलिप्स यांसारख्या कंपन्यांनीही कॅम्पस प्लेसमेंटसाठी अर्ज केला आहे. बंगळुरु आणि हैदराबाद येथील कॅम्पसमधून या प्लेसमेंट होतील. यासाठी विविध शाखेच्या 350 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यावर्षी कंपन्यांची नजर आर्टिफिशिअल इंटेलिजेन्स आणि ऑटोमेशन क्षेत्रावर असेल.

Technology News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Apple to come in India for first time to take campus placements
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

Olx प्रमाणे फेसबुकवरही जुन्या वस्तू विका आणि खरेदी करा!
Olx प्रमाणे फेसबुकवरही जुन्या वस्तू विका आणि खरेदी करा!

मुंबई : फेसबुकने जुन्या वस्तू खरेदी करण्यासाठी आणि विकण्यासाठी

भारतात पहिल्यांदाच 5G ची झलक, स्पीड पाहून थक्क व्हाल
भारतात पहिल्यांदाच 5G ची झलक, स्पीड पाहून थक्क व्हाल

नवी दिल्ली : भारतात नवीन 5G सेवेसाठी पायाभूत सुविधा निर्माण

व्हॉट्सअॅप कॉलिंग आणखी मजेदार, लवकरच दोन नवे फीचर्स
व्हॉट्सअॅप कॉलिंग आणखी मजेदार, लवकरच दोन नवे फीचर्स

मुंबई : व्हॉट्सअॅपने नुकतंच डिलीट फॉर एव्हरीवन फीचर दिलं आहे,

तब्बल 8GB रॅम, वनप्लस 5T लाँच
तब्बल 8GB रॅम, वनप्लस 5T लाँच

नवी दिल्ली : वनप्लसने 5T हा बहुप्रतिक्षीत स्मार्टफोन लाँच केला आहे.

पंतप्रधान मोदी ट्विटरवर लोकप्रिय का? अमेरिकेतील विद्यापीठाचं अध्ययन
पंतप्रधान मोदी ट्विटरवर लोकप्रिय का? अमेरिकेतील विद्यापीठाचं...

वॉशिंग्टन : केंद्र सरकारच्या साडे तीन वर्षांच्या काळातील अनेक

One Plus 5T स्मार्टफोनचं लाँचिंग अवघ्या काही तासात
One Plus 5T स्मार्टफोनचं लाँचिंग अवघ्या काही तासात

मुंबई : वन प्लस 5T हा स्मार्टफोन आज (गुरुवार) लाँच होणार आहे. भारतीय

नव्या रेनॉल्ट डस्टर कारचा सॉलिड लूक
नव्या रेनॉल्ट डस्टर कारचा सॉलिड लूक

मुंबई : रेनॉल्ट ‘डस्टर’ कारचं नवं मॉडेल आणलं आहे. या कारमध्ये

व्हॉट्सअॅपवर डिलीट केलेले मेसेज पुन्हा वाचता येतात!
व्हॉट्सअॅपवर डिलीट केलेले मेसेज पुन्हा वाचता येतात!

मुंबई : व्हॉट्सअॅपने नुकतंच एक फीचर दिलं आहे, ज्यामुळे तुम्ही चुकून

तब्बल 5000mAh क्षमतेची बॅटरी, जिओनीचा नवा फोन लाँच
तब्बल 5000mAh क्षमतेची बॅटरी, जिओनीचा नवा फोन लाँच

नवी दिल्ली : जिओनीचा एम 7 पॉवर हा जबरदस्त स्मार्टफोन भारतात लाँच झाला

गुगल पिक्सेल 2 XL ची विक्री सुरु, किंमत आणि फीचर्स
गुगल पिक्सेल 2 XL ची विक्री सुरु, किंमत आणि फीचर्स

नवी दिल्ली : गुगलचा फ्लॅगशिप स्मार्टफोन पिक्सेल 2XL ची विक्री भारतात