त्या सिक्रेट डिनरबाबत भुवनेश्वर कुमार म्हणतो...

भुवनेश्वर कुमारने एक क्रॉप केलेला फोटो शेअर केला होता. आता तो पूर्ण फोटो त्याने शेअर केला आहे.

त्या सिक्रेट डिनरबाबत भुवनेश्वर कुमार म्हणतो...

नवी दिल्ली : विवाह बंधनात अडकणाऱ्या टीम इंडियाच्या खेळाडूंची यादी वाढत आहे. युवराज सिंह, हरभजन सिंह, सुरेश रैना आणि रोहित शर्माचा यात समावेश आहे. मात्र कर्णधार विराट कोहलीसह असे काही खेळाडू आहेत, जे अजून बॅचलर्स आहेत. या बॅचलर्स खेळाडूंपैकीच एक असलेला भुवनेश्वर कुमार आता चर्चेत आला आहे.

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने नुकतंच त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव जाहीरपणे सांगितलं आहे. भुवीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो त्याच्या गर्लफ्रेंडसोबत दिसत आहे. भुवीने हा फोटो इंस्टाग्रामवर अपलोड करताच चाहत्यांनी त्याला शुभेच्छा द्यायला सुरुवात केली.A post shared by Bhuvneshwar Kumar (@imbhuvi) on


हेयर इज द बेटर हॉफ ऑफ द पिक्चर @नुपूर नागर’’ असं कॅप्शन भुवीने फोटोला दिलं. 11 मे रोजी भुवीने एक क्रॉप केलेला फोटो शेअर केला आणि डिनर डेट फुल पिक सूनअसं कॅप्शन दिलं. त्यानंतर आता भुवीने पूर्ण फोटो शेअर करुन सस्पेंस संपवला आहे.

भुवीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेत शानदार प्रदर्शन केलं होतं. त्यानंतर 7 ऑक्टोबरपासून सुरु होत असलेल्या टी-20 मालिकेतही तो भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे.

क्रीडा शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

LiveTV