BMWची नवी कार लाँच, किंमत 38.6 लाख

बीएमडब्ल्यूने 3-सीरीजमधील नवी कार 320 डी एडिशन स्पोर्ट लाँच केली आहे.

BMWची नवी कार लाँच, किंमत 38.6 लाख

मुंबई : बीएमडब्ल्यूने 3-सीरीजमधील नवी कार 320 डी एडिशन स्पोर्ट लाँच केली आहे. याची किंमत 38.6 लाख (एक्स शोरुम) आहे. 320 डी प्रेस्टिज आणि स्पोर्ट लाइन व्हेरिएंटपेक्षा थोडा वेगळा लूक या कारला देण्यात आला आहे.

bmw 1 (2)

या कारमध्ये 2.0 लीटर टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन आहे. जे 190 पीएस पॉवर आणि 400 एनएम टॉर्क देतं. यामध्ये 8 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आहे. या कारचा टॉप स्पीड 250 किमी प्रतितास आहे. 7.2 सेंकदात ही कार 100 किमी वेग पकडते. या कारचं मायलेज 22.69 किमी प्रतिलीटर असल्याचा कंपनीचा दावा आहे.

bmw 1 (1)

या कारचं केबिन स्पोर्टी बनवण्यात आलं आहे. यामध्ये ड्यूल टोन ब्लॅक आणि लाल रंगाचं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळेल. या कारमध्ये 9 स्पीकरसोबत म्युझिक सिस्टम देण्यात आली आहे.
बातमी सौजन्य : cardekho.com

टेक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV