आंबेडकर जयंतीनिमित्त ‘भीम’ अॅप वापरणाऱ्यांना कॅशबॅक ऑफर

डिसेंबर 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भीम अॅप लॉन्च केलं. अत्यंत कमी कालावधीत गूगल तेज, फोन पे आणि पेटीएमच्या स्पर्धेत भीम अॅप उतरलं.

By: | Last Updated: 14 Apr 2018 09:56 AM
आंबेडकर जयंतीनिमित्त ‘भीम’ अॅप वापरणाऱ्यांना कॅशबॅक ऑफर

मुंबई : डिजिटल व्यवहार करण्यासाठी जर तुम्ही सरकारने सुरु केलेले ’भीम’ (BHIM) अॅप वापरत असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. भीम अॅप वापरणाऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आजपासून कॅशबॅकची ऑफर मिळणार आहे.

या अॅपच्या कॅशबॅक ऑफरमधून ग्राहकांना एका महिन्याला 750 रुपये आणि व्यावसायिकांना 1 हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळू शकतो.डिसेंबर 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भीम अॅप लॉन्च केलं. अत्यंत कमी कालावधीत गूगल तेज, फोन पे आणि पेटीएमच्या स्पर्धेत भीम अॅप उतरलं. डिजिटल ट्रॅन्झॅक्शनमध्ये गेल्या काही काळात या अॅपने फारशी कमाल दाखवली नाही. त्यामुळे आता नवनव्या ऑफर्स दिल्या जात आहेत.

भीम अॅप कसं वापरणार?

• अँड्रॉईड स्मार्टफोनवर भीम अॅप BHIM प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करा.
• त्यानंतर तुमचं बँक खातं आणि त्यासोबत यूपीआय पिन तयार करा. (हा पर्याय अप डाऊनलोड करतानाचा विचारला जातो)
• तुमचा मोबाईल नंबर हाच तुमचा पेमेंट अड्रेस असेल.
• मोबाईल क्रमांक नोंदवल्यानंतर भीम अॅपचा वापर करता येईल.
• इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषांचा पर्याय या अॅपमध्ये सध्या उपलब्ध आहे.
• भीम अॅपद्वारे यूझर्स पैसे पाठवू शकतात, किंवा इतरांकडून मोबाईल नंबरवर घेऊही शकतात.
• एमएमआयडी किंवा आयएफएससी कोडच्या माध्यमातून नॉन-यूपीआय बँकेच्या ग्राहकांनाही पैसे पाठवता येऊ शकतात.
• यासाठी अॅपमध्ये इंग्रजी भाषेत सेंड किंवा रिसीव्ह मनी असा पर्याय देण्यात आला आहे.

संबंधित बातमी : मोदींनी लाँच केलेलं भिम अॅप नेमकं कसं चालतं?

टेक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: cashback offers on BHIM app latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV