4G VoLTE, अँड्रॉईड नॉगट; कूलपॅडचा नोट 5 Lite C स्मार्टफोन लाँच

चीनी स्मार्टफोन कंपनी कूलपॅडनं नोट 5 Lite C हा नवा स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे.

4G VoLTE, अँड्रॉईड नॉगट; कूलपॅडचा नोट 5 Lite C स्मार्टफोन लाँच

मुंबई : चीनी स्मार्टफोन कंपनी कूलपॅडनं नोट 5 Lite C हा नवा स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. याची किंमत 7,777 रुपये आहे. आजपासून (शनिवार) हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.

ग्रे आणि गोल्ड या रंगामध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध असून दिल्ली, हरियाणा, तेलंगणा, कर्नाटक, तमिळनाडू, आंधप्रदेश, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये सुरुवातीला हा स्मार्टफोन मिळणार आहे.

नोट 5 Lite C मध्ये 5 इंच स्क्रीन देण्यात आली असून याचं रेझ्युलेशन 1280x720 पिक्सल आहे. यामध्ये 1.1 GHz क्वॉड कोअर स्नॅपड्रॅगन 210 चिपसेट देण्यात आलं आहे. यामध्ये 2 जीबी रॅम देण्यात आली आहे.

या स्मार्टफोनमध्ये 16 जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली असून 64 जीबीपर्यंत मेमरी वाढवता येऊ शकणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 8 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

या स्मार्टफोनची बॅटरी 2500 mAh आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉईड 7.1 नॉगटवर आधारित आहे. तसेच यामध्ये ड्यूल सिम देण्यात आलं असून 4G VoLTE, ब्ल्यूटूथ, फिंगर प्रिट सेन्सर हे फीचरही देण्यात आले आहेत.

टेक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV