डिलीट केलेली मीडिया फाईल पुन्हा डाऊनलोड करता येणार!

फोनमधून डिलीट झालेली मीडिया फाईल पुन्हा डाऊनलोड न होणं ही सर्वात मोठी समस्या आहे. मात्र व्हॉट्सअॅपने आता ही समस्या दूर केली आहे.

डिलीट केलेली मीडिया फाईल पुन्हा डाऊनलोड करता येणार!

मुंबई : व्हॉट्सअॅपने अँड्रॉईड युझर्ससाठी नवं फीचर आणलं आहे. फोनमधून डिलीट झालेली मीडिया फाईल पुन्हा डाऊनलोड न होणं ही सर्वात मोठी समस्या आहे. मात्र व्हॉट्सअॅपने आता ही समस्या दूर केली आहे. फोनमधून डिलीट झालेल्या फाईल्स व्हॉट्सअॅपवर पुन्हा डाऊनलोड करता येतील.

एखाद्या युझरने मोबाईलमधील फोटो, GIFs, व्हिडीओ, ऑडिओ किंवा एखादी डॉक्युमेंट फाईल डिलीट केली असेल तर ती व्हॉट्सअॅप सर्व्हरच्या मदतीने पुन्हा डाऊनलोड करता येईल. तुम्हाला जिथून ही फाईल आलेली असेल त्या चॅटमध्ये डिलीट केलेलीही फाईल आता मिळेल.

WABetaInfo च्या वृत्तानुसार यापूर्वी अँड्रॉईड युझर्स केवळ 30 दिवसांपर्यंतचा जुना डेटा डाऊनलोड करु शकत होते. सोबतच तुम्ही कुणीतरी पाठवलेली मीडिया फाईल डिलीट केली तर ती सर्व्हरवरुनही गायब होत असे. मात्र आता व्हॉट्सअॅपवर डिलीट केलेल्या फाईल्सही उपलब्ध असतील.

फाईल्स सर्व्हरवर ठेवल्यानंतरही सुरक्षेच्या दृष्टीने काटेकोरपणे काळजी घेतली जाणार आहे. कारण, पूर्ण फाईल्स या एंड टू एंट एनक्रिप्टेड असतील.

टेक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: deleted media files can download again on whats app
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV