सावधान! वेब ब्राऊजरमध्ये तुम्हीही पासवर्ड सेव्ह करताय?

सिक्युरिटी रिसर्चर्सने ब्राऊजर्सच्या इनबिल्ट पासवर्ड मॅनेजरमध्ये एक बग शोधला आहे, जो 11 वर्षे जुना आहे.

सावधान! वेब ब्राऊजरमध्ये तुम्हीही पासवर्ड सेव्ह करताय?

मुंबई : लॉग इन करणं सोपं जावं म्हणून अनेक जण पासवर्ड ऑटो सेव्ह करतात. मात्र तुमची ही सवय अंगाशी येऊ शकते. सिक्युरिटी रिसर्चर्सने ब्राऊजर्सच्या इनबिल्ट पासवर्ड मॅनेजरमध्ये एक बग शोधला आहे, जो 11 वर्षे जुना आहे. यामुळे तुमच्या वेब ब्राऊजरमध्ये सेव्ह असलेले पासवर्ड आणि इतर माहिती चोरली जाऊ शकते.

कोणत्या वेब ब्राऊजरमधून पासवर्ड चोरले जाऊ शकतात?

गुगल क्रोम कम्प्युटरवर वापरल्या जाणाऱ्या सर्वाधिक लोकप्रिय वेब ब्राऊजरपैकी एक आहे. यामध्ये सेव्ह केलेले पासवर्ड हॅक होऊ शकतात. याशिवाय मोझिला फायरफॉक्स, ओपेरा ब्राऊजर आणि मायक्रोसॉफ्टच्या एज ब्राऊजरमध्येही हा पासवर्ड मॅनेजरचा बग आढळून आला आहे.

या सर्व ब्राऊजरमध्ये एक पासवर्ड मॅनेजर असतो, ज्यामध्ये तुमचे यूआरएल, युझरनेम आणि पासवर्ड सेव्ह होतात. त्यासाठी तुमची परवानगीही मागितली जाते.

पासवर्ड कोण चोरतं?

AdThink आणि OnAudiance नावाच्या दोन कंपन्यांचा पासवर्डवर डोळा असल्याचं प्रिंस्टन सेंटर फॉर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पॉलिसीच्या काही संशोधकांना आढळून आलं आहे. थर्ड पार्टी ट्रॅकिंग स्क्रिप्टच्या माध्यमातून या वेबसाईट वेबपेजच्या बॅकग्राऊंडला न दिसणाऱ्या लॉग इन फॉर्मला इंजेक्ट करतात. यामुळे पासवर्ड, युझरनेम यांसारखी माहिती चोरली जाऊ शकते.

स्वतःची सुरक्षा कशी कराल?

गुगल क्रोम, मोझिला आणि इतर कोणतंही वेब ब्राऊजर वापरताना युझरनेम आणि पासवर्ड ऑटो सेव्ह न करणं हा सर्वात सोपा उपाय आहे. याशिवाय पासवर्ड ऑटो सेव्ह करण्याचे इतरही तोटे आहेत. आपोआप लॉग इन होत असेल, तर तुमच्या कुणाकडून त्याचा गैरफायदाही घेतला जाऊ शकतो.

टेक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: do not auto save password in web browser
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV