मुंबईत ड्रोन रेसिंग स्पर्धेची धामधूम, राज्यभरातून 52 स्पर्धकांचा सहभाग

आजवर आपण खरंतर अनेक शर्यती पाहिल्या आहेत. ऐकून आहोत. अगदी ससा आणि कासवाच्या शर्यतीपासून ते अगदी ऑलिम्पिकच्या शर्यतीपर्यंत. मात्र मुंबईत एक वेगळ्याच शर्यतीची स्पर्धा सुरु आहे.

Drone racing in Mumbai latest updates

मुंबई : आतापर्यंत आपण रेसिंगच्या अनेक स्पर्धा पाहिल्या असतील. मात्र, मुंबईत पहिल्यांदाच भारतातील एक आगळी-वेगळी स्पर्धा सुरु आहे. ती स्पर्धा म्हणजे नॅनो ड्रोनची.

आजवर आपण खरंतर अनेक शर्यती पाहिल्या आहेत. ऐकून आहोत. अगदी ससा आणि कासवाच्या शर्यतीपासून ते अगदी ऑलिम्पिकच्या शर्यतीपर्यंत. मात्र मुंबईत एक वेगळ्याच शर्यतीची स्पर्धा सुरु आहे.

लहानपणी उडवलेल्या कागदी विमानांची आठवण यावी अशी ही स्पर्धा. छोट्या आकाराचे विमान ‘प्लुटो कंट्रोलर’ मोबाइल अॅप्लिकेशनच्या मदतीने या स्पर्धकांकडून उडवले जात आहेत. मोबाईल गेम ज्या पद्धतीने खेळलं जातं, अगदी त्याच पद्धतीने हे लहान ड्रोन चालवले जातात. यामध्ये काही ड्रोन आपला मार्ग व्यवस्थित काढतात, तर काही ड्रोन या स्पर्धेत धडकन खाली पडतात.

“मुंबईत मोकळ्या जागी ड्रोन उडवायला परवानगी नसल्याने बंदिस्त जागी आपल्याला ही स्पर्धा भरवली लागली. अन्याथा ही शर्यत आपल्याला अवकाशात सुद्धा आयोजित करता येते.”, असं आयआयटी मुंबईत शिक्षण घेतलेल्या आणि सध्या स्टार्ट अप सुरु करून मेड इन इंडिया ड्रोन बनवणाऱ्या अपूर्व गोडबोलेंनी सांगितलं.

ड्रोनबद्दलच जागरुकता वाढावी, त्याचसोबत हे बनवण्याच तंत्र अगदी लहान वयात कळावं, यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धेचं आयोजन करण्यामागचा हेतू असल्याचं आयोजकांनी सांगितलं. यासोबतच स्पर्धकांना यासाठी विशेष वर्कशॉप घेऊन ड्रोनबाबतच प्रशिक्षण देण्यात आलं आहे. त्यामुळे एक आगळ्यावेगळ्या स्पर्धेचा आनंद या स्पर्धकांनी घेतला.

या स्पर्धेत एकूण 52 स्पर्धक सहभागी झाले असून, विशेष म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातून या नाविन्यपूर्ण स्पर्धेसाठी प्रवेश आले आहेत. अगदी 11 ते 40 वर्षे वयोगटातील स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. अशाप्रकारच्या ड्रोनच्या स्पर्धा या आधी चीन, अमेरिका या देशात झालेल्या आहेत. मात्र भारतात अशा प्रकारच्या स्पर्धेचा थरार पाहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. उद्यापर्यंत म्हणजे 10 सप्टेंबरपर्यंत ही स्पर्धा सुरुच राहणार आहे.

आपल्यातल्या अनेकांना फक्त कॅमेरा ड्रोन याबाबत माहिती होती. मात्र येथे आल्यावर खऱ्या अर्थानं ड्रोन कसा चालवायचा, कसा निर्माण करायचा याबाबत प्रशिक्षण येथे दिलं जात असून, हाच या स्पर्धेमागचा हेतू आहे. त्यामुळे अशाप्रकारच्या स्पर्धा जर देशभरात झाल्या तर खऱ्या अर्थाने ड्रोनबद्दलची माहिती, प्रशिक्षण, जागरुकता लोकांमध्ये होईल.

Technology News शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:Drone racing in Mumbai latest updates
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:

Related Stories

तब्बल 4000mAh क्षमतेची बॅटरी, लेनोव्हो K8 लाँच
तब्बल 4000mAh क्षमतेची बॅटरी, लेनोव्हो K8 लाँच

नवी दिल्ली : लेनोव्होने भारतात के सीरिजचा नवा स्मार्टफोन के 8 लाँच

सर्व मोबाईलवर भरघोस सूट, शाओमीचा दिवाळी सेल
सर्व मोबाईलवर भरघोस सूट, शाओमीचा दिवाळी सेल

मुंबई : शाओमीच्या ‘दिवाळी विथ Mi’ सेलला उद्यापासून सुरुवात होत

देशात 2020 पर्यंत 5G चं युग सुरु होणार!
देशात 2020 पर्यंत 5G चं युग सुरु होणार!

नवी दिल्ली : केंद्र सरकारने उच्च स्तरीय 5G समितीची नियुक्ती केली आहे.

Nokia 8 स्मार्टफोन लाँच, किंमत 36,999 रु.
Nokia 8 स्मार्टफोन लाँच, किंमत 36,999 रु.

मुंबई : नोकियाचा बहुप्रतीक्षित नोकिया 8 स्मार्टफोन अखेर आज (मंगळवार)

... म्हणून सत्या नडेला यांनी आपल्या पत्नीसाठी अमेरिकेचं नागरिकत्व सोडलं होतं!
... म्हणून सत्या नडेला यांनी आपल्या पत्नीसाठी अमेरिकेचं नागरिकत्व...

नवी दिल्ली : मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांचं ‘हिट रिफ्रेश’ या

पंतप्रधान मोदींकडून आदित्य ठाकरेंचं जाहीर कौतुक
पंतप्रधान मोदींकडून आदित्य ठाकरेंचं जाहीर कौतुक

मुंबई: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवासेना प्रमुख आदित्य

नोकिया 8 आज भारतात लाँच होणार
नोकिया 8 आज भारतात लाँच होणार

नवी दिल्ली : नोकियाचा बहुप्रतीक्षित नोकिया 8 आज भारतात लाँच होणार

देशविरोधी ट्वीट, केंद्राकडून 115 अकाऊंट बंद करण्याचे आदेश
देशविरोधी ट्वीट, केंद्राकडून 115 अकाऊंट बंद करण्याचे आदेश

नवी दिल्ली : केंद्र सरकारने ट्विटरला विश्वसनीय माहिती प्रसिद्ध

फेसबुकचा राजा, एबीपी माझा! राज्यात नंबर वन, तर देशात सहावा
फेसबुकचा राजा, एबीपी माझा! राज्यात नंबर वन, तर देशात सहावा

मुंबई : फेसबुकवर सर्वाधिक व्हिडिओ पाहिल्या जाणाऱ्या पेजमध्ये

Samsung Anniversary Sale: सॅमसंगच्या अनेक स्मार्टफोनवर घसघशीत सूट
Samsung Anniversary Sale: सॅमसंगच्या अनेक स्मार्टफोनवर घसघशीत सूट

मुंबई : स्मार्टफोन खरेदी करायचा असल्यास आता एक सुवर्णसंधी आहे. कारण