जगभरात फेसबुक डाऊन, कोट्यवधी यूजर्स हैराण

जगभरात फेसबुक डाऊन, कोट्यवधी यूजर्स हैराण

मुंबई: जगभरातील सर्वात मोठी सोशल मीडिया नेटवर्किंग वेबसाइट फेसबुक आज (मंगळवार) सकाळी पूर्णत: ठप्प झाली होती. जगभरातील कोट्यवधी यूजर्सनं सकाळी फेसबुक लॉग इन केल्यानंतर त्यांना या अडचणीचा सामना करावा लागला.

ऑस्ट्रेलिया आणि आशियातील 1.6 कोटी यूजर्सला याचा फटका बसला. ऑस्ट्रेलियात सकाळी 11 वाजेपासून यूजर्सला फेसबुक सुरु करण्यात अडचणी येत होत्या.

facebook-down

फेसबुक डाऊन असल्यानं यूजर्सनं फेसबुक लॉग इन केल्यावर त्यांना एरर असल्याचं दाखवलं जात होतं. ‘समथिंग वेंट रांग’ असं या एररमध्ये दाखवलं जात होतं.

फेसबुक डाऊन होताच हा मुद्दा ट्विटरवर ट्रेंड करणं सुरु झालं. काही यूजर्सनं फेसबुक डाऊन झाल्यानं ट्विटरवर त्याची खिल्लीही उडवली. फेसबुककडून मिळालेल्या माहितीनुसार, तांत्रिक बिघाडामुळे यूजर्सला या समस्येचा सामना करावा लागला. काही वेळानं मात्र, फेसबुकनं ही अडचण दूर केली. त्यानंतर फेसबुक पुन्हा एकदा सुरु झालं.

टेक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV