फेसबुककडे 27 कोटी बनावट अकाऊंटची माहिती

फेसबुकने त्यांच्या प्लॅटफॉर्मवर 27 कोटी बनावट अकाऊंट सुरु असल्याचं मान्य केलं आहे.

फेसबुककडे 27 कोटी बनावट अकाऊंटची माहिती

लंडन : 2016 मधील अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत रशियाच्या हस्तक्षेपावरुन फेसबुकची भूमिका आधीच संशयाच्या घेऱ्यात आहे. त्यातच आता एक नवी माहिती समोर आली आहे. फेसबुकने त्यांच्या प्लॅटफॉर्मवर 27 कोटी बनावट अकाऊंट सुरु असल्याचं मान्य केलं आहे.

'द टेलीग्राफ'ने दिलेल्या वृत्तानुसार, फेसबुकने गेल्याच आठवड्यात आपल्या त्रैमासिक उत्पन्नाचे आकडे जाहीर केले. त्यानुसार, अपेक्षा पेक्षा दहा लाख पटीने जास्त बनावट खाती (फेसबुकवर) असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

विशेष म्हणजे, 'द वॉशिंग्टन पोस्टने'ही ऑक्टोबरमध्ये असेच वृत्त प्रकाशित केलं होतं. त्यानुसार, फेसबुकने सिनेटर्सना सांगितलं होतं की, त्यांच्या 12.6 कोटी यूझर्सनी रशियाचं उत्पादित आणि वितरित साहित्य पाहिलं असेल. फेसबुकची ही माहिती देखील आधीच्या माहितीपेक्षा कित्येक पट जास्त होती.

कारण, फेसबुकने सुरुवातीला सांगितलं होतं की, जवळपास 10 लाख यूझर्सनी अशा जाहिराती पाहिल्या होत्या.

टेक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: facebook has information of 27 million fake accounts in his social networking platform
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV