लाईक्स आणि शेअरसाठी आवाहन करणाऱ्यांवर फेसबुकचा बडगा

फेसबुकवरुन लाईक्स आणि पोस्ट शेअरिंगचं आवाहन करणाऱ्यावर चाप बसवण्याची तयारी कंपनीने सुरु केली आहे. अशा पोस्ट पब्लिश करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.

लाईक्स आणि शेअरसाठी आवाहन करणाऱ्यांवर फेसबुकचा बडगा

हयूस्टन : सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकने आता लाईक्स आणि पोस्ट शेअरिंगचं आवाहन करणाऱ्यावर चाप बसवण्याची तयारी सुरु केली आहे. अशा पोस्ट पब्लिश करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. फेसबुकने सोमवारी एक ब्लॉग शेअर करुन याबाबतची माहिती दिली.

फेसबुकच्या या ब्लॉगमधून सांगितलंय की, काही फेसबूक यूजर्स न्यूजफीडमध्ये आपली पोस्ट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या क्लृप्त्या वापरतात. अशा प्रकारच्या पोस्टना engagement bait म्हटलं जातं. पण आता अशा प्रकारच्या पोस्टना आपल्या न्यूजफीडमध्ये संधी न देण्याचा निर्णय फेसबुकने घेतला आहे.

फेसबुकमधील ऑपरेशन्स इंटिग्रिटी विशेषज्ञ हेनरी सिल्वरमॅन यांनी लिहिलं आहे की, "अशा प्रकारच्या आर्टिफिशयल प्रकारातील अॅगेजमेंट बेटिंगने फेसबुक रिच वाढवणाऱ्या पोस्टचं लवकरच डिमोशन करण्यास सुरुवात केली जाईल."

विशेष म्हणजे, अनेक फेसबुक यूजर्स, कंपन्या, एखादी पोस्ट शेअर करुन, ती आपल्या मित्रांना टॅग करा, अशा प्रकारचे मेसेज करतात. यातून त्या पोस्टला जास्तीत जास्त लाईक्स किंवा कमेंट मिळूवून; त्या पोस्ट लोकप्रियतेची मानकं पार करण्याचा प्रयत्न असतो. यामुळे फेसबुकच्या न्यूजफीडमध्ये ट्रेण्ड करु लागतात.

यावरुनच कंपनीने आपल्या ब्लॉगमध्ये स्पष्ट केलंय की, आता अशा प्रकारच्या पोस्टना डिमोड केलं जाईल. ज्या फेसबुक पेजवरुन अशा प्रकारच्या ट्रिक्स वापरुन वारंवार पोस्ट शेअर केली जात असेल, तर त्यांची पोस्ट डिमोशन केली जाईल.

दरम्यान, फेसबुकवरुन लोकांना मदतीचं आवाहन, सल्ला, शिफारस मागणाऱ्या पोस्ट बाबत कंपनीने आपल्या भूमिकेत कोणताही बदल केलेला नाही. अशा प्रकारच्या पोस्टवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. पण ज्यातून फेसबुकवरील स्पॅम, दिशाभूल करणाऱ्या आणि क्लिकबेट पोस्टसना चाप बसवण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे.

कंपनीने लाखोंच्या संख्येने फेसबुकवरील पोस्टची समीक्षा केल्यानंतर हे पाऊल उचललं आहे. कंपनीने यासाठी एक मशीन लर्निंग मॉडेलही तयार केलं आहे. ज्यातून अशा प्रकारच्या पोस्टना पकडता येतील, असंही कंपनीने सांगितलं आहे.

टेक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: FA
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV