Whatsappवर 'ही' खोटी लिंक व्हायरल, लिंकवर क्लिक करणं टाळा!

By: | Last Updated: > Wednesday, 17 May 2017 7:12 PM
fake link viral on whatsapp latest update

मुंबई: मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपवर मागील काही दिवसांपासून एक खोटी यूआरएल (URL) लिंक व्हायरल होत आहे. या लिंकमध्ये व्हॉट्सअॅप वेगवेगळ्या रंगात डाऊनलोड करता येईल असा दावा करण्यात आला आहे.

पण ही लिंक खोटी आहे. जेव्हा यूजर्स या लिंकवर क्लिक करतात तेव्हा त्यांच्या स्मार्टफोनवर एक वेबसाईट सुरु होते. ही वेबसाईट व्हॉट्सअॅपची अधिकृत वेबसाईट नाही. ही वेबसाईट सुरु होताच ही लिंक आपोआप तुमच्या फोन कॉन्टॅक्ट लिस्टमधील सर्व यूजर्संना सेंड होते.

तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील यूजर्सला एक  मेसेज सेंड होतो. ज्यामध्ये लिहलेलं असतं की, ‘आय लव्ह द न्यू कलर ऑफ व्हॉट्सअॅप.’ याच मेसेजसोबत खोटी लिंकही दिली जाते. या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर एक अॅडवेअर अॅप डाऊनलोड होत असल्याची तक्रार काही यूजर्सनं केली आहे.

अॅडवेअर अॅप डाऊनलोड झाल्यानंतर अशी माहिती दिली जाते की, व्हॉट्सअॅपचे कलर फक्त व्हॉट्सअॅपच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. यासाठी तुम्हाला ब्लॅकव्हॉट्स नावाचं अॅप डाऊनलोड करावं लागेल.

पण हे फेक अॅप गुगलनं प्ले स्टोअरवर बॅन केलं आहे. जर तुम्हालाही असा मेसेज आला तर सावधान राहा. कारण की, व्हॉट्सअॅपनं आतापर्यंत मल्टी कलर सेवा सुरु केलेली नाही.

 

First Published:

Related Stories

फोर्डने तब्बल 39,315 कार परत मागवल्या
फोर्डने तब्बल 39,315 कार परत मागवल्या

मुंबई: फोर्ड इंडियानं स्टेअरिंग पॉवर होजमध्ये बिघाड असलेल्या 39,315

सॅमसंगच्या सर्वात महागड्या स्मार्टफोनचे फीचर्स लीक
सॅमसंगच्या सर्वात महागड्या स्मार्टफोनचे फीचर्स लीक

मुंबई: सॅमसंग लवकरच आपल्या Note सीरीजमधील नवा स्मार्टफोन लाँच

कोहलीची सलमानवर मात, फेसबुकवर दुसऱ्या स्थानी विराजमान!
कोहलीची सलमानवर मात, फेसबुकवर दुसऱ्या स्थानी विराजमान!

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून प्रशिक्षकासोबतच्या वादामुळे

6 जीबी रॅम, 4000 mAh बॅटरी, ऑनर 8 प्रो स्मार्टफोन भारतात लाँच
6 जीबी रॅम, 4000 mAh बॅटरी, ऑनर 8 प्रो स्मार्टफोन भारतात लाँच

मुंबई: हुआवेनं आपला नवा स्मार्टफोन ऑनर 8 प्रो लाँच केला आहे. हा

एअरटेलची नवी मान्सून ऑफर, ग्राहकांना मिळणार मोफत 4जी डेटा
एअरटेलची नवी मान्सून ऑफर, ग्राहकांना मिळणार मोफत 4जी डेटा

मुंबई : रिलायन्स जिओनं टेलिकॉम क्षेत्रात पाऊल टाकल्यानंतर

6GB RAM, 4000mAh बॅटरी, 'हुआवे'चा नवा स्मार्टफोन लाँच
6GB RAM, 4000mAh बॅटरी, 'हुआवे'चा नवा स्मार्टफोन लाँच

नवी दिल्ली : हुआवेने ऑनर ब्रँडचा ‘ऑनर 8 प्रो’ हा स्मार्टफोन

आजपासून ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर धमाकेदार ऑफर्स
आजपासून ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर धमाकेदार ऑफर्स

मुंबई : आजपासून ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर धमाकेदार ऑफर्स देण्यात

ह्युंदाईच्या नव्या वेरना कारची पहिली झलक
ह्युंदाईच्या नव्या वेरना कारची पहिली झलक

मुंबई: ह्युंदाईनं आपल्या नव्या वेरना सेडान कारचं टीझर नुकतंट लाँच