बनावट व्हॉट्सअॅप 10 लाख युझर्सकडून डाऊनलोड

हुबेहूब व्हॉट्सअॅपप्रमाणेच दिसणाऱ्या या अॅपबद्दल माहिती नसल्याने युझर्सने हेच अॅप डाऊनलोड केलं.

बनावट व्हॉट्सअॅप 10 लाख युझर्सकडून डाऊनलोड

मुंबई : व्हॉट्सअॅपचं एक बनावट अॅप दहा लाख युझर्सने डाऊनलोड केलं आहे. या अॅप डेव्हलपरने गुगल सिक्युरिटीला केराची टोपली दिली आहे. हुबेहूब व्हॉट्सअॅपप्रमाणेच दिसणाऱ्या या अॅपबद्दल माहिती नसल्याने युझर्सने हेच अॅप डाऊनलोड केलं.

गुगल प्ले स्टोअरवर व्हॉट्सअॅप WhatsApp Inc डेव्हलपरच्या नावाने आहे. मात्र हे बनावट अॅपही याच नावाने आहे. त्यामुळे ग्राहकांची दिशाभूल झाली. बनावट अॅप ओळखण्यासाठी युझर्स डेव्हलपरचं नाव वाचतात. मात्र या डेव्हलपरने नावही हुबेहूब दिल्यामुळे ग्राहकांची फसवेगिरी झाली.

https://twitter.com/virqdroid/status/926437790140772362

हॅकर्सने युनिकोडचा वापर करुन हुबेहूब नावं दिलं असावं, असं बोललं जात आहे. रेडिट युझरने एक स्क्रीन शॉट शेअर केला आहे. ज्यामध्ये WhatsApp+Inc%C3%A0 लिहिलेलं आहे. मात्र ते गुगल प्ले स्टोअरवर WhatsApp Inc डेव्हलपरच्या नावाने दिसत आहे. त्यामुळे तुम्हीही तुमचं अॅप बनावट आहे, की खरं हे तातडीने तपासून पाहा.

व्हॉट्सअॅपच्या पॉलिसीनुसार तुमचे मेसेज, फोटो, व्हिडिओ आणि एकूण गोपनीय माहिती तुमच्या व्यतिरिक्त कुणीही पाहू शकत नाही. मात्र या बनावट अॅपच्या माध्यमातून तुमच्या फाईल्सचा गैरवापर केला जाऊ शकतो. त्यामुळे या गंभीर समस्येकडे गुगलनेही पाहण्याची गरज आहे.

टेक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: fake whatsapp downloaded by 10 lakh users
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV