ही आहे VOLVOची पहिली मेड-इन-इंडिया कार

वोल्व्होच्या कार भारतात तयार झाल्यास त्यांच्या किंमती बऱ्याच कमी होऊ शकतात. त्यामुळे त्यांच्या विक्रीत वाढ होऊ शकते.

ही आहे VOLVOची पहिली मेड-इन-इंडिया कार

बंगळुरु : वोल्व्होनं आपली पहिली मेड-इन-इंडिया कार एक्ससी90 जगासमोर आणली आहे. वोल्व्होनं ही कार बंगळुरुतील कारखान्यात तयार केली आहे. याच कारखान्यात कंपनी ट्रक, बस आणि इतर  इंजिन तयार करण्याच काम करते. येत्या काही दिवसात इथं एस90 सेदान आणि दुसऱ्या जनरेशनची एक्ससी 60 एसयूव्ही कारही तयार करणार आहे.

वोल्व्हो ऑटो इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक चार्लिस फ्रंप यांनी याबाबत बोलताना सांगितल की, 'भारताच्या कार बाजारात वोल्व्होचा हिस्सा पाच टक्के आहे. 2020 पर्यंत यात दुप्पट वाढ व्हावी यासाठी आम्ही नवी योजना तयार करत आहोत. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी मेड-इन-इंडिया प्रोडक्टची भूमिका महत्त्वाची असणार आहे.’

वोल्व्होच्या कार भारतात तयार झाल्यास त्यांच्या किंमती बऱ्याच कमी होऊ शकतात. त्यामुळे त्यांच्या विक्रीत वाढ होऊ शकते. भारतात कार तयार केल्यास येत्या काळात वोल्व्होच्या कारची मागणी वाढू शकते असाही अंदाज वर्तवण्यात येत आहे.

बातमी सौजन्य : cardekho.com

टेक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV