Google Pixel 2 आणि iPhone7 वर बंपर सूट

फ्लिपकार्टच्या बिग शॉपिंग डे सेलमध्ये गुगल पिक्सल, आयफोन 7 यासह अनेक स्मार्टफोनवर घसघशीत सूट देण्यात आली आहे.

Google Pixel 2 आणि iPhone7 वर बंपर सूट

मुंबई : फ्लिपकार्टच्या बिग शॉपिंग डे सेलमध्ये गुगल पिक्सल, आयफोन 7 यासह अनेक स्मार्टफोनवर घसघशीत सूट देण्यात आली आहे. 7 डिसेंबर ते 9 डिसेंबरदरम्यान फ्लिपकार्टचा हा सेल असणार आहे. या सेलमध्ये अनेक जबरदस्त डीलही मिळू शकतील.

Google Pixel2: या सेलमध्ये गुगल पिक्सल 2चा बेस मॉडेल 39,999 रुपयात उपलब्ध आहे. ज्यावर 11,000 रुपयांचं फ्लॅट डिस्काउंट देण्यात आलं आहे. याशिवाय काही खास डेबिट-क्रेडिट कार्डवर 10000 रुपये अतिरिक्त सूट आहे. तसेच तुम्ही आपला जुना स्मार्टफोन एक्सचेंज केल्यास तुम्हाला 18,000 रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे. अशा पद्धतीनं तुम्ही हा स्मार्टफोन अवघ्या 39,999 रुपयात खरेदी करु शकतात. सध्या बाजारात याची किंमत 61000 रुपये आहे.

iPhone 7: आयफोन 7 हा स्मार्टफोन या सेलमध्ये 39,999 रुपयांना खरेदी करता येईल. याच्या मूळ किंमतीवर 10000 रुपयांची सूट देण्यात आली आहे. याचा लिमिटेड स्टॉकच विक्रीसाठी उपलब्ध आहे.

MiA1 : शाओमीच्या पहिला अँड्रॉई़ड वन स्मार्टफोन MiA1 खरेदी करण्याची चांगली संधी आहे. या स्मार्टफोनवर 2000 रुपयांची सूट देण्यात आली आहे. त्यामुळे 14, 999 रुपयांचा हा स्मार्टफोन तुम्ही 12,999 रुपयात खरेदी करता येणार आहे.

रेडमी 5A : याशिवाय शाओमीचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन रेडमी 5Aची पहिली विक्री 7 डिसेंबर दुपारी 12 वाजेपासून सुरु होणा रआहे.

कॅनव्हॉस इनफिनिटी प्रो : मायक्रोमॅक्सनं कॅनव्हास  इनफिनिटी प्रो ज्याची किंमत 13,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन देखील या सेलमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.

टेक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title: flipkart big shopping day sale offer on iphone 7 and Google Pixel2 latest update
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV