फ्लिपकार्टच्या 'फ्रीडम सेल'ची घोषणा, ग्राहकांसाठी खास ऑफर

फ्लिपकार्टचा 'द बिग फ्रीडम सेल' 9 ऑगस्ट ते 11 ऑगस्टपर्यंत असणार आहे.

फ्लिपकार्टच्या 'फ्रीडम सेल'ची घोषणा, ग्राहकांसाठी खास ऑफर

मुंबई : अमेझॉननंतर आता फ्लिपकार्टनंही ग्राहकांसाठी नव्या सेलची घोषणा केली आहे. फ्लिपकार्टचा 'द बिग फ्रीडम सेल' 9 ऑगस्ट ते 11 ऑगस्टपर्यंत असणार आहे.

या सेलमध्ये मोबाइल फोन, टीव्ही, लॅपटॉप, टॅबलेट, हेडफोन, कॅमेरा आणि अक्सेसरीजवर घसघशीत सूट मिळणार आहे. तसेच या सेलमध्ये एचडीएफसीच्या क्रेडिट कार्ड यूजर्संना अतिरिक्त सूटही मिळणार आहे.

या सेलमध्ये शाओमीच्या रेडमी नोट 4ची विक्री तब्बल 72 तास सुरु असणार आहे. पण फ्लिपकार्टनं अद्याप तरी कोणकोणत्या ऑफर असणार आहेत हे स्पष्ट केलेलं नाही. पण काही ऑफर्सबाबत मात्र माहिती दिलेली आहे.

flipkart sale 1

काय-काय असणार ऑफर?

मोटो M आणि मोटो G5 प्लसची किंमत 15,999 रुपये आणि 16,999 रुपये आहे. पण या सेलमध्ये हे फोन 12,999 रुपये आणि 14,999 रुपयांना उपलब्ध असणार आहे. याप्रमाणेच इतरही स्मार्टफोनवर बरीच सूट असणार आहे.

गुगल पिक्सल XL या स्मार्टफोनवर देखील बरीच सूट मिळणार आहे. 67,000 किंमतीचा हा स्मार्टफोन 48,999 रुपयांना मिळणार आहे. या सेलमध्ये आणखी किती ऑफर असणार हे 9 ऑगस्टलाच समोर येणार आहे.

टेक शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा. तसंच आमचं Marathi News App डाऊनलोड करा!
Web Title:
Find Marathi News from Mumbai, Pune, Nashik, Politics, Technology, Sports, Bollywood, Agriculture. याशिवाय आणखी काही रंजक बातम्या
First Published:
LiveTV